मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कुठे आणि कसा पाहता येईल सलमान खानचा ‘Radhe Your Most Wanted Bhai’?

कुठे आणि कसा पाहता येईल सलमान खानचा ‘Radhe Your Most Wanted Bhai’?

सलमानच्या चाहत्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. कोरोना असला तरी तुम्ही चित्रपट मिस करणार नाही याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.

सलमानच्या चाहत्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. कोरोना असला तरी तुम्ही चित्रपट मिस करणार नाही याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.

सलमानच्या चाहत्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. कोरोना असला तरी तुम्ही चित्रपट मिस करणार नाही याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 13 मे: सलमान खानचा (Salman Khan) राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर आज 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची चर्चा होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे जात होती. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 13 मे रोजी राधे प्रदर्शित होणार आहे. परंतु कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर चित्रपट पाहायचा कसा? हा एक मोठा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. परंतु सलमानच्या चाहत्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. कोरोना असला तरी तुम्ही चित्रपट मिस करणार नाही याची काळजी निर्मात्यांनी घेतली आहे.

कुठे आणि कसा पाहता येईल राधे युअर मोस्ट वॉन्डेड भाई?

राधे हा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सिनेमागृह या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. ज्या ठिकाणी लॉकडाउन नाही त्या ठिकाणी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहता येईल. मात्र उर्वरीत चाहत्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागणार आहे.

राधे Zee5 या अ‍ॅपवर दुपारी 12 वाजल्यापासून स्ट्रीम होणार आहे. परंतू चित्रपट पाहण्यासाठी यूजरला Zeeplex या ऑप्शनवर जावं लागणार लागेल, या ठिकाणी एक ठराविक चार्जेस भरुन चित्रपटाचा आनंद घेता येईल. दिलेल्या माहितीनुसार ही किंमत 499 इतकी ठेवण्यात आली आहे. ट्रान्सेक्शन झाल्यानंतरच तुम्हाला हा चित्रपट पाहता येणार आहे. तसंच चार्जेस भरून हा चित्रपट पाहिल्यानंतर वर्षभर zee 5 आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत लाभ घेण्याची मुभा देखील देण्यात आलीय.

या व्यक्तीमुळं पाठकबाईंना मिळालं ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये काम

" isDesktop="true" id="550482" >

‘राधे’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A सर्टिफिकेट दिलंय. म्हणजेच हा चित्रपट प्रेक्षक त्यांच्या कुटूंबासोबत पाहू शकतील. 57 मिनिटांचा हा चित्रपट आहे, अशी चर्चा आहे.. ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा ‘राधे’ हा आतापर्यंचा सगळ्यात लहान चित्रपट ठरला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Salman khan, Salman Khan (TV Actor)