तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळं घराघरात पोहोचलेली अक्षया देवधर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Akshaya deodhar/Instagram)
2/ 10
या मालिकेत तिनं साकारलेली पाठक बाई ही व्यक्तिरेखा तुफान गाजली. अनेक चाहते तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी पाठकबाई म्हणूनच ओळखतात यावरुनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. (Akshaya deodhar/Instagram)
3/ 10
आज अक्षयाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Akshaya deodhar/Instagram)
4/ 10
छोट्या पडद्यावर भोळ्याभाबड्या राणादाच्या प्रेमात पडलेल्या अक्षयाला तुझ्यात जीव रंगला ही मालिका मिळाली तरी कशी? हा प्रश्न अनेकदा तिला विचारला जातो. (Akshaya deodhar/Instagram)
5/ 10
या प्रश्नाचं उत्तर एकदा तिनं हवा येऊ द्या शोमध्ये दिलं. लेखक सुबोध खानविलकरमुळं तिला पाठकबाईंची भूमिका मिळाली होती. (Akshaya deodhar/Instagram)
6/ 10
अन् यासाठी तिनं त्याचे आभारही मानले होते. शिवाय त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये देखील तिनं सुबोधवर कौतुकाचा वर्षाव केला होता. (Akshaya deodhar/Instagram)
7/ 10
तो पहिल्या दिवसापासून माझ्या पाठिशी भक्कमपणे उभा होता. आज मी जे काही थोडे फार यश मिळवलं त्यामध्ये सुबोधचा मोठा वाटा आहे असं ती म्हणाली होती. (Akshaya deodhar/Instagram)
8/ 10
अक्षयाला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. तिनं प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Akshaya deodhar/Instagram)
9/ 10
तुझ्यात जीव रंगला ही तिची पहिली मालिका आहे. मात्र याच मालिकेमुळं ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. चाहत्यांनी तिच्या अंजली पाठक या भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं. (Akshaya deodhar/Instagram)
10/ 10
आता अक्षया इतर दुसऱ्या कुठल्या भूमिकेत झळकणार याची वाट पाहात आहेत. तिला दुसऱ्या भूमिकांमध्ये पाहायला उत्सुक आहेत. (Akshaya deodhar/Instagram)