मुंबई, 4 जून : चीनच्या वूहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारत ते अमेरिका, स्पेन, इटली, पाकिस्तान, रूस सारखे अनेक देश आता या व्हायरसच्या संक्रमणाची शिकार ठरले आहेत. या व्हायरसचं सर्वाधिक संक्रमण अमेरिका आणि इटलीमध्ये पाहायला मिळालं. या व्हायरसमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशात फक्त बॉलिवूड सेलिब्रेटीच नाही तर अनेक हॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा मदतीसाठी पुढे आले आहेत. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर एनिस्टननं (Jennifer Aniston)या कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जेनिफरनं या कोरोना व्हायरसच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईसाठी फंड जमवण्याकरता आपल्या न्यूड फोटोचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जेनिफरचे हे फोटो 1995 मधील आहेत. त्यावेळी जेनिफर तिचा टीव्ही शो फ्रेंड्समुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीनं सांगितलं की या फोटोंच्या लिलावातून तिला जी रक्कम मिळणार आहे ती संपूर्ण रक्कम कोरोना व्हायरस रिलीफ फंडसाठी दान केली जाणार आहे. दोन वेळा घटस्फोट आणि सिंगल मदर, तिसऱ्यांदा प्रेमात पडलीय श्वेता तिवारी
इन्स्टाग्रामवरुन याची माहिती देताना अभिनेत्रीनं लिहिलं, माझा खास मित्र मार्कनं काही निवडक 25 फोटोंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात एक फोटो माझा सुद्धा आहे. मार्कनं हा लिलाव करण्याचा निर्णय कोरोना रिलीफ फंड जमवण्यासाठी घेतला आहे. या लिलावातून मिळाणारी सर्व रक्कम ही एका अशा संस्थेला दिली जाणार आहे जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांचं फ्री कोरोना व्हायरस टेस्टिंग आणि उपचार याची सुविधा देत आहे. धन्यवाद मार्क या फोटोची सुरुवातीची किंमत 6500 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. कोरोनानंतर आता चक्रीवादळ; कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नसेल!
या पोस्टसोबत अभिनेत्रीनं एक व्हिडीओ आणि आपला फोटो सुद्धा पोस्ट केला आहे. जो या लिलावात जाणार आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर सर्वजण खूप कौतुक करत आहेत. जेनिफर एनिस्टननं काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर डेब्यू केला होता. ज्यानंतर अगदी कमी वेळात म्हणजे 5 तास 16 मिनिटांत तिनं 1 मिलियन फॉलोवर्सचं रेकॉर्ड केलं होतं. यासाठी तिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. अक्षयनं खास परवानगी घेत लॉकडाऊनमध्ये केलं ‘या’ जाहिरातीचं शूटिंग, पाहा VIDEO