शाहरुखनं पार्टीमध्ये फराह खानच्या नवऱ्याला लगावली होती कानशीलात, वाचा नेमकं काय घडलं

शाहरुखनं पार्टीमध्ये फराह खानच्या नवऱ्याला लगावली होती कानशीलात, वाचा नेमकं काय घडलं

वाचा पार्टीमध्ये शिरीष आणि शाहरुखमध्ये असं काय घडलं ज्यामुळे शाहरुखनं सर्वांसमोर शिरीषच्या लगावली कानशीलात

  • Share this:

मुंबई, 25 मे : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे असे अनेक किस्से आहेत जे ऐकल्यावर कोणीही हैराण होईल. असाच एक किस्सा आहे शाहरुख खान आणि त्याची बेस्ट फ्रेंड फराह खान यांच्यातला. पण हा किस्सा फराहचा पती शिरीष कुंदरशी संबंधीत आहे. असं म्हटलं जातं की एका पार्टीमध्ये शिरीष आणि शाहरुखमध्ये असं काही घडलं होतं ज्यामुळे शाहरुखला राग अनावर झाला होता आणि रागाच्या भरात त्यानं सर्वांसमोर शिरीषच्या कानशीलात लगावली. हा पार्टीत संजय दत्त होस्ट म्हणून उपस्थित होता. एवढंच नाही तर फराह खाननं सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती.

शाहरुख खाननं फराह खानच्या पतीच्या कानाखाली का मारलं याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले गेले. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार त्यावेळी शिरीष नशेत होता आणि पार्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी शाहरुख जाईल त्या त्या ठिकाणी तो त्याला फॉलो करत होता. ज्यामुळे शाहरुखला खूप राग आला. त्यानं रागाच्या भरात शिरीष सोफ्यावर पाडलं आणि त्याच्या चेहऱ्यावर जोरात बुक्का मारला.

'बिग बॉस'नंतर बदलला रश्मि देसाईचा अंदाज, लॉकडाऊनमध्ये केलं BOLD फोटोशूट

 

View this post on Instagram

 

Never let the things you want , make you forget the things you have! #happythanksgivng SO much to be grateful for..♥️

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder) on

याच वृत्तात हेही सांगण्यात आलं होतं की, फराह खाननं स्वतः याबाबत हेडलाइन टुडेला प्रतिक्रिया दिली होती. हेडलाइन टुडेशी बोलताना फराह म्हणली, शिरीष, माझ्या नवऱ्याला शाहरुख आणि त्याच्या तीन बॉडागार्ड्सनी संज दत्तच्या पार्टीमध्ये मारलं आहे. शाहरुखनं शिरीषला विचारलं तू माझ्याविरोधात ट्वीट का केलं. आमच्या बाजून शाहरुखला कोणीच चिडवलं नव्हतं. मात्र तो शिरीषवर ओरडत होता. तसेच त्यानं माझं करिअर बर्बाद करण्याचीही धमकी दिली.

या भांडणांनंतर संजय दत्तनं हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानेही शिरीषवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्याच्या कानशीलात लगावली होती. या प्रकरणावर स्वतः शाहरुखनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर दुसरीकडे शिरीषनंही कोणताही कारवाई केली नाही. अर्थात काही काळानंतर शाहरुख आणि फराहच्या मैत्रीत आलेला दुरावा कमी झाला आणि त्यांचे संबंध सुधारले.

'FRSH' हे काय नवीन? भाईजानकडून चाहत्यांना ईदची अनोखी भेट

...आणि शिरीष पडला स्वतःपेक्षा 8 वर्षांनी मोठ्या फराह खानच्या प्रेमात!

First published: May 25, 2020, 9:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading