Home /News /news /

...आणि शिरीष पडला स्वतःपेक्षा 8 वर्षांनी मोठ्या फराह खानच्या प्रेमात!

...आणि शिरीष पडला स्वतःपेक्षा 8 वर्षांनी मोठ्या फराह खानच्या प्रेमात!

फराह आणि शिरीष यांच्यात जवळापास 8 वर्षांचं अंतर आहे. पण या दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

  मुंबई, 24 मे : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. फराह आणि शिरीष बॉलिवूडच्या हिट जोड्यांपैकी एक आहे पण फराह आणि शिरीष यांच्यात जवळापास 8 वर्षांचं अंतर आहे. फराह शिरीष पेक्षा मोठी आहे. पण या दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. शिरीष कुंदरचा जन्म 24 मे 1973 ला मेंगलोर येथे झाला होता. इलेक्टॉनिक इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोटोरोला कंपनीमध्ये जॉब करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यानं फिल्म इंडस्ट्रीमध्ये एडिटर म्हणून काम करायला सुरुवात केली. फराह आणि शिरीष यांची ओळ मै हूं ना सिनेमाच्या सेटवर झाली. शिरीषला पहिल्याच नजरेत फराह आवडली होती त्यामुळे त्यानं कमी पैशात हा सिनेमा एडिट करण्यासाठी तो तयार झाला. फराहला त्याच्या भावनांबद्दल काहीच कल्पना नव्हती. ती तिच्या करिअरमध्ये बीझी होती. तिच्याकडे प्रेमासाठी वेळ नव्हता. पण शिरीषचा प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता यामुळे ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागाली.
  शिरिषनं सर्वात आधी फराहला प्रपोज केलं. पण त्याला कोणत्याही प्रकारचा टाइमपास करायचा नव्हता. तो फराहसोबत भविष्याची स्वप्न पाहत होता. एका टॉक शोमध्ये फराहनं सांगितलं होतं, शिरीषनं मला सांगितलं. डार्लिंग तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर निघून ये मी फक्त तुला पाहून माझा वेळ वाया घालवू शकत नाही. जर तू या नात्याबद्दल गंभीर असशील आणि आपण लग्न करू तरच मी हे नातं पुढे घेऊन जाऊ इच्छितो. फराहनं बराच विचार करून या नात्याला होकार दिला. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा रजिस्टर मॅरेज केलं आणि नंतर साउथ इंडियन स्टाइलमध्ये लग्न आणि निकाह केला.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या