'बिग बॉस'नंतर बदलला रश्मि देसाईचा अंदाज, लॉकडाऊनमध्ये केलं BOLD फोटोशूट

'बिग बॉस'नंतर बदलला रश्मि देसाईचा अंदाज, लॉकडाऊनमध्ये केलं BOLD फोटोशूट

नेहमीच क्यूट लुकमध्ये दिसणारी रश्मि देसाई यावेळी मात्र खूपच बोल्ड लुकमध्ये दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे : लॉकडाऊनमुळे सध्या सिनेमांपासून ते टीव्ही मालिकांपर्यंत सर्वच शूटिंग बंद आहेत. त्यामुळे सर्वच सेलिब्रेटी सध्या सोशल मीडियावर टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. अशात बिग बॉस 13ची स्पर्धक आणि टीव्ही इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावरील तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. नेहमीच क्यूट लुकमध्ये दिसणारी रश्मि देसाई यावेळी मात्र खूपच बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळत आहे.

रश्मि देसाई तिच्या बिनधास्त स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या लॉकडाऊनमध्ये तर ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. पण नेहमीच क्यूट आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या रश्मिनं नुकताच एका फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती बोल्ड आणि बिनधास्त लुकमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोला रश्मिनं कॅप्शन दिलं, 'सुरवात करण्यासाठी आधी हिंमत करा' हा फोटोमध्ये रश्मि ओपन लूज शर्टमध्ये दिसत आहे. रश्मिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

राम कपूरनं दिला होता सर्वात मोठा इंटिमेट सीन, 17 मिनिटांचा Video झाला होता Viral

 

View this post on Instagram

 

Dare to begin . . #ItsAllMagical #IAmMagic‍♀️ #RhythmicRashami #RashamiDesai #BoldAndBeautiful

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai) on

अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची रश्मिची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अनेकदा असे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण यावेळी बऱ्याच काळानंतर ती अशाप्रकारे बोल्ड लुकमध्ये दिसली आहे. रश्मिच्या या लुकचं फक्त तिच्या चाहत्यांनीच कौतुक केलेलं नाही तर दिलजीत कौर, मोनिका बेदी आणि करिश्मा तन्ना या अभिनेत्रींनीही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मावशीचा कोरोनामुळे मृत्यू, अंतिम दर्शनही घेणं झालं अशक्य

श्रीदेवीमुळे अनिल आणि बोनी यांच्यात झालं होतं जोरदार भांडण, वाचा नेमकं काय घडलं

First published: May 24, 2020, 11:05 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या