मुंबई, 6 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वजण सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. या आजारापासून वाचण्यासाठी सर्वच सेलेब्स आपल्या सिनेमांचं शूटिंग थांबवून आपापल्या कुटंबासोबत टाइम स्पेंड करत आहे. सोशल मीडियावर लाइव्ह चॅट, फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणे यातून सर्व सेलिब्रेटी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशात सेलिब्रेटींचे काही जुने किस्से फोटो आणि व्हिडी सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक किस्सा आहे अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची सासू डिंपल कपाडिया यांचा. अक्षय आणि ट्विंकल यांच्या लग्नाला आता 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र जेव्हा यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता त्यावेळी अक्षयच्या सासूनं त्याच्यासमोर एक अजब अट ठेवली होती.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे सध्या बॉलिवूडमधलं सर्वात बेस्ट कपल मानलं जातं. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. पण त्यांच्या लग्नाचा किस्सा खूपच मजेशीर आहे. अक्षय-ट्विंकल यांच्या लग्नाच्या अगोदर अक्षयची सासू डिंपल कपाडिया यांना वाटायचं की अक्षय 'गे' आहे. त्यामुळेच त्यांनी लग्नाच्या आधी अक्षय समोर एक अट ठेवली होती. 2016 मध्ये जेव्हा अक्षय आणि ट्विंकल यांनी करण जोहरच्या शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्यानं लग्नाबाबत अनेक खुलासे केले.
पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूला बायोपिकसाठी लीड रोलमध्ये हवा आहे सलमान खान
या शोमध्ये ट्विंकलनं अक्षय बद्दल सर्वात मोठा खुलासा केला होता की, तिची आई अक्षयला गे समजत असे. तिला अक्षयवर यासाठी संशय होता कारण तिच्या एक जर्नलिस्ट फ्रेंडनं तिला असं सांगितलं होतं. त्यामुळे जेव्हा आमच्या लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा तिनं अक्षयबाबत माहिती काढायला सुरुवात केली.
View this post on Instagram
Grandmother’s 80th with family, friends and loads of laughter #ShilimDiaries
अक्षय आणि ट्विंकल यांचा दोन वेळा साखरपुडा झाला आणि मोडला सुद्धा. जेव्हा अक्षयनं ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा तिचा 'मेला' हा सिनेमा प्रदर्शित होणार होता आणि तिला विश्वास होता की हा सिनेमा हिट होईल. त्यामुळे तिनं अक्षयला म्हटलं की हा सिनेमा फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेन. पण अखेर हा सिनेमा फ्लॉप झाला आणि ट्विंकलनं लग्नाला होकार दिला. पण तरीही या दोघंचं लग्न होऊ शकलं नाही.
निकचा HOT VIDEO पाहून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, प्रियांकाचा बिनधास्त खुलासा
ट्विंकलची आई डिंपल कपाडिया यांनी या लग्नाला नकार दिला. त्यांनी अक्षयसमोर एक अट ठेवली की, अक्षयनं ट्विंकलसोबत एक वर्ष लिव्ह इनमध्ये राहावं. अक्षयनं त्यांची ही अट मान्य केली आणि एक वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. या एका वर्षात डिंपल यांनी अक्षयच्या खानदानात कोणला काय आजार आहे. या कुटुंबातले लोक लवकर टकलू तर होत नाही ना. कोणाचं कोणत्या आजारानं निधन झालं आहे अशा सर्व गोष्टींची माहिती गोळा केली होती. त्यानंतर 2001 मध्ये अक्षय-ट्विंकलचं लग्न झालं.
(संपादन- मेघा जेठे)
'मी 3 वर्ष दारू प्यायले नाही पण...' पूजा भटनं सांगितलं लोकांच्या आक्रमकतेचं कारण