जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / निकचा HOT VIDEO पाहून मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, प्रियांकाचा बिनधास्त खुलासा

निकचा HOT VIDEO पाहून मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, प्रियांकाचा बिनधास्त खुलासा

निकचा HOT VIDEO पाहून मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, प्रियांकाचा बिनधास्त खुलासा

अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला यावर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बिनधास्त खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 मे : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस नेहमीच चर्चेत राहणारं कपल आहे. सध्या हे दोघंही होम क्वारंटाइन असून सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. प्रियांका वेगवेगळ्या कोरोना इव्हेंटच्या माध्यमातून भारतीय चाहत्याची मदत करताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण सुद्धा ते शेअर करताना दिसत आहेत. निक आणि प्रियांका मेट गालाच्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा भेटले होते आणि त्यानंतर 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2018 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेलं हे कपल लग्नानंतरही वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिलं. त्यावेळी बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेल्या प्रियांकानं निकशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता खुद्द प्रियांकानंच या प्रश्नचं उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीत प्रियांका चोप्रानं तिच्या आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल अनेक खुलासे केले. याचवेळी तिनं निकशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचं मजेशीर कारणही सांगितलं. निकला डेट करण्याआधी तिनं त्याचा एक व्हिडीओ पाहिला होता. हा व्हिडीओ 2016 मध्ये रिलीज झालेल्या निकच्या एका गाण्याचा आहे. ज्यात तो फक्त अंडरगारमेंटमध्ये दिसत आहे.

जाहिरात

निकचा हा व्हिडीओ पाहून प्रियांका त्याच्यावर इतकी फिदा झाली की, तिनं त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निक-प्रियांका यांनी डिसेंबर 2018 मध्ये उमेदभवन पॅलेस येथे शाही थाटात लग्न केलं. या लग्नात कोणत्याही फोटोग्राफरला येण्यास मनाई होती त्यामुळे बराच काळ त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले नव्हते. पण जेव्हा ते समोर आले. तेव्हा त्यांच्या लग्नाची भव्यता सर्वांनी पाहिली.

प्रियांकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर मागच्या वर्षी रिलीज झालेला तिचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. मात्र या सिनेमाचं समीक्षकांनी कौतुक केलं. या सिनेमासाठीच प्रियांकानं सलमान खानच्या भारत सिनेमात काम करण्यास नकार दिला होता.ज्यावर नंतर सलमाननं तिला बरेच टोमणे सुद्धा मारले होते. लवकरच निक-प्रियांकाच्या संगीत सेरेमनीवर आधारित वेब सीरिज रिलीज होणार होती. मात्र सध्या कोरोना व्हायरसच्या जगभरातील संक्रमाणानंतर ही वेबसीरिज लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. (संपादन- मेघा जेठे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात