मुंबई, 25 डिसेंबर- करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुलांची नावं अनेकदा चर्चेत असतात. दोन्ही मुलांना जन्मापासूनच त्यांच्या नावावरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा करिना आणि सैफच्या मुलांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकताच मध्य प्रदेशात असा काही प्रकार घडला, की लोक थक्क झाले आहेत. मध्य प्रदेशातील एका खाजगी शाळेनं इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना करिना कपूर आणि सैफ अली खानच्या मुलाचे नाव सामान्यज्ञान परीक्षेत विचारलं आहे. त्यानंतर पालक-शिक्षक संतप्त झाले आहेत. आणि त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रारदेखील केली आहे.
हे प्रकरण खंडवा येथील अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलचं आहे. येथे गुरुवारी इयत्ता सहावीची मुले सामान्य ज्ञानाचा पेपर देत होती. या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न होता - 'करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या मुलाचे नाव?' ही प्रश्नपत्रिका परीक्षेतून बाहेर येताच एकच गोंधळ उडाला आहे.या प्रश्नावर पालक शिक्षक संघटनेनं आक्षेप घेत म्हटलं आहे की, मुलांना काही विचारायचं असेल तर देशातील वीर योद्धयांवर प्रश्न विचारायला हवे होते. या गोष्टीचा निषेध व्यक्त करत त्यांनी म्हटलं, आता शाळकरी मुलांनाही लक्षात ठेवावे लागेल का, चित्रपट विश्वातील कोणत्या कलाकाराच्या घरात जन्मलेल्या मुलाचे नाव काय?
शाळेला मिळाली नोटीस-
करिनासंबंधी या प्रश्नावर आता पालकांनी जिल्हा प्रशासनाकडे शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. यावर जिल्हा शिक्षणाधिकारी एस.के.भालेराव यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असल्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापनाविरुद्ध नोटीस बजावली जाईल. ते म्हणाले की, परीक्षेत मुलांना कोणते प्रश्न विचारले जाऊ नयेत, याची काळजी खासगी शिक्षण संस्थांनी घ्यावी.
(हे वाचा: आशका गोराडियाचं Topless योगा; Photo शेअर करत ट्रोलर्ससाठी लिहिला खास मॅसेज)
या प्रश्नांमध्ये इतरही अनेक प्रश्न होते. जसे की भारताच्या पहिल्या बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे नाव. भारतीय वायुसेनेच्या पायलटचे नाव ज्यांचं लढाऊ विमान पाकिस्तानमध्ये कोसळलं. IPL 2019 जिंकणारा संघ. यासोबतच उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचे नाव काय आहे.असे अनेक प्रश्न यामध्ये होते.
करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दोन मुले आहेत. त्यापैकी मोठा मुलगा तैमूर अली खान हा फक्त 5 वर्षांचा आहे. सैफीनाला एक लहान मुलगाही आहे. ज्याचं नाव जेह अली खान आहे. तो आता 10 महिन्यांचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kareena Kapoor, Saif Ali Khan