मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आशका गोराडियाचं Topless योगा; Photo शेअर करत ट्रोलर्ससाठी लिहिला खास मॅसेज

आशका गोराडियाचं Topless योगा; Photo शेअर करत ट्रोलर्ससाठी लिहिला खास मॅसेज

  अभिनेत्री   (Tv Actress)  आशका गोराडिया   (Aashka Goradia)  ही टीव्ही मालिकांमधील सुनेच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. टीव्हीवर अतिशय साधी आणि सुंदर दिसणारी आशका रिअल लाईफमध्ये अतिशय हॉट आणि बोल्ड आहे.

अभिनेत्री (Tv Actress) आशका गोराडिया (Aashka Goradia) ही टीव्ही मालिकांमधील सुनेच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. टीव्हीवर अतिशय साधी आणि सुंदर दिसणारी आशका रिअल लाईफमध्ये अतिशय हॉट आणि बोल्ड आहे.

अभिनेत्री (Tv Actress) आशका गोराडिया (Aashka Goradia) ही टीव्ही मालिकांमधील सुनेच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. टीव्हीवर अतिशय साधी आणि सुंदर दिसणारी आशका रिअल लाईफमध्ये अतिशय हॉट आणि बोल्ड आहे.

मुंबई,25 डिसेंबर-   अभिनेत्री   (Tv Actress)  आशका गोराडिया   (Aashka Goradia)  ही टीव्ही मालिकांमधील सुनेच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. टीव्हीवर अतिशय साधी आणि सुंदर दिसणारी आशका रिअल लाईफमध्ये अतिशय हॉट आणि बोल्ड आहे. अनेक मालिकांमधून तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या फिटनेसचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावरही येते. आशकाचे हे व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही की ही टीव्ही अभिनेत्री इतकी अवघड योगा पोज इतक्या सहज करू शकेल.परंतु आज आपण तिच्या नव्या योगा पोजबद्दल जाणून घेणार आहोत, यामध्ये अभिनेत्री टॉपलेस योगा   (Aashka Goradia Topless Yoga)  पोज देताना दिसत आहे.

आशका गोराडियाने आपल्या इन्स्टाग्रामवर योगा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.यामध्ये आशका टॉपलेस दिसून येत आहे. समुद्राच्या काठावर हेडस्टँडच्या मुद्रेत ती दिसून येत आहे. तिचा हा फोटो शेअर करून अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना चपराक दिली आहे. आशकाने तिच्या मागील बाजूचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या पाठीवर लाल रंगात 'वन लव्ह' हा हॅशटॅग लिहिलेला आहे.

यासोबत आशकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'हे किती मजेशीर आहे की, जे लोक तुम्हाला ओळखतही नाहीत ते तुमच्याबद्दल इतकं बोलतात. हे खरंच हास्यास्पद आहे की त्यांना असं वाटतं की हे सगळं आपल्याला माहिती नाही. माझे पाय आकाशात आणि माझं डोकं जमिनीवर.. आयुष्यभर. माझी पाठ बळकट आहे..म्हणून ट्रोल करणाऱ्यांना जीवदान मिळत आहे'.

(हे वाचा:Taarak Mehta...फेम भिडे मास्टरच्या सोनूने सांगितलं आपल्या बॉयफ्रेंडचं नाव )

आशका गोराडियाच्या या पोस्टचे चाहते तर कौतुक करतच आहेत. शिवाय अभिनेत्रीचे अनेक सहकारी टीव्ही कलाकारही तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. टीव्ही अभिनेत्री सध्या अभिनयापासून दूर आहे. आणि तिचा पती ब्रेंट गोबलसोबत वेळ घालवताना दिसत आहे. ब्रेंटनेआशकाचे हे फोटो काढले आहेत.आशका नुकताच अभिनेत्री मौनी रॉयच्या बॅचलर पार्टीमध्ये दिसून आली होती. मौनी रॉय आणि या गर्ल गॅंगने गोव्यात ही पार्टी केली होती. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मौनी आणि आशका 'नागिन' मालिकेत एकत्र दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यात फार चांगलं बॉन्डिंग आहे. आशका सध्या अभिनयापासून दूर 'बिझनेस वुमेन' म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Tv actress