जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आई कुठे काय करते' मालिकेचा असा होणार शेवट, आप्पा लावून देणार अरुंधती- आशुतोषचं लग्न?

'आई कुठे काय करते' मालिकेचा असा होणार शेवट, आप्पा लावून देणार अरुंधती- आशुतोषचं लग्न?

'आई कुठे काय करते' मालिकेचा असा होणार शेवट, आप्पा लावून देणार अरुंधती- आशुतोषचं लग्न?

What is end of AAI kuthe Kay Karte : लवकरच मालिकेत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आप्पा अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नासाठी पुढाकार घेताना दिसणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च- आई कुठे काय करते (aai kuthe kay karte ) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत आशुतोषनं देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील प्रेम व्यक्त केले आहे. यावेळी आई-आप्पा तसेच तिथं अनिरुद्ध देखील उपस्थित होता. या नवीन ट्वीस्टमुळे मालिकेचे संपूर्वण चित्रचं पालटलं आहे. आता मात्र सोशल मीडियावर मालिकेचा शेवट कसा असणार (aai kuthe kay karte end ) याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. यासाठी अरुंधतीचे सासरे आप्पा ( arundhati and ashutosh marriage ) पुढाकर (AAI kuthe Kay Karte Latest Episode ) घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. आशुतोषने देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली दिली आहे. यानंतर घरातील संपूर्णच वातावरण बदलून जाते. शिवाय अरुंधती ज्याला मित्र समजत होती त्याच्या मनात आपल्याबद्दल अशा भावना असल्याचे समजल्यानंतर काही काळ अस्वस्थ होते. मात्र तिचा मुलगा यश तिची समजुत काढतो आणि ती या विषयावर आशुतोषसोबत बोलण्याचा निर्णय घेते. अरुंधती आशुतोषची भेट घेते आणि या भेटीमध्ये आशुतोषही अरुंधतीसमोर त्याचं मन मोकळं करतो. त्याचं कॉलेजपासून अरुंधतीवर असलेलं प्रेम, भारतात पुन्हा आल्यावर जुळून आलेल्या गोष्टी यांविषयी तो अरुंधतीला समजावून सांगतो. तो तिला सांगतो की, ’ मी तुला विसरून जाईन असं मला वाटलं होतं. माझ्या मनात तू जशी होतीस, तू तशी आजही आहेस,’ अशा शब्दांत आशुतोष त्याचं प्रेम व्यक्त करतो. प्रेम व्यक्त करताना कोणतीच अपेक्षा नसल्याचंही तो सांगतो. यानंतर तू जो निर्णय घेशील असं देखील तो म्हणतो. वाचा- मी आदेश बांदेकरांचा नातेवाईक आहे, असं सांगत केली जातेय फसवणूक यानंतर अरुंधती आशुतोषसमोर तिचं प्रेम फक्त अनिरुद्ध देशमुखवर असल्याचे सांगते व यापुढेही त्याच्यावरच राहिल असे देखील सांगते. मात्र असं जरी असलं तरी मित्र म्हणून मला तुझ्यासोबत काम करण्यास कसलीच अडचण नसल्याचे स्पष्ट करते. मात्र यापेक्षा जास्त मला गुंतता येणार नाही असं म्हणत अरुंधती आपली बाजू स्पष्ट करताना दिसते. यानंतर मात्र भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांची कल्पना मात्र तो अरुंधतीला देतो. ‘जगातल्या अनेक लोकांना आपली मैत्री खटकणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मनात स्पष्टता आहे, तोपर्यंत आपण यातल्या कोणत्याच गोष्टीची पर्वा करण्याचं कारण नसल्याचे मैत्रिच्या नात्याने आशुतोष अरुंधतील समजावताना दिसतो.

जाहिरात

यानंतर मालिकेत मात्र मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या आगामी भागात समृद्धी बंगल्यामध्ये जे काही घडलेलं असतं ते अनघा आणि अविनाश ह आप्पांना सांगतात. ते सांगत असताना तिथं कांचन येते. तिला पाहून आप्पा अनघा आणि अविनाशला म्हणतात की, ‘यांच्या मनातली घाण स्वच्छ होणारच नाही. अनिरुद्ध आता अरुंधतीचा नवरा नाही. पण बदललेली परिस्थिती तुम्हाला समजून घ्यायचीच नाही. मी असतो तर त्याला सांगितलं असतं, मी माझ्या लेकीला समजावतो, तू तिच्याशी लग्न कर.. ‘आप्पांचं हे बोलणं ऐकून कांचनला मोठा धक्का बसतो.

हा आगामी ट्वीस्ट मालिकेचे रूप पालटून टाकणारा ठरणार शिवाय. यामुळे अशी देखील चर्चा रंगली आहे की, आई कुठे काय करते मालिकेचा शेवट हा अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाने होणार आहे. मात्र हे सत्य आहे की चर्चा याचा उलगडा येणाऱ्या भागातच समजणार आहे. शिवाय अरुंधती आणि आशुतोषच्या नात्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात