जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / धक्कादायक! मी आदेश बांदेकरांचा नातेवाईक आहे, असं सांगत केली जातेय फसवणूक

धक्कादायक! मी आदेश बांदेकरांचा नातेवाईक आहे, असं सांगत केली जातेय फसवणूक

धक्कादायक! मी आदेश बांदेकरांचा नातेवाईक आहे, असं सांगत केली जातेय फसवणूक

आदेश बांदेकर यांचा मी नातेवाईक आहे असे सांगून काही जणांशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सोशल मीडियावरून सर्वांना सर्तक राहण्याचे आवाहान केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मार्च- होम मिनिस्टरमुळे अभिनेते आदेश बांदेकर ( aadesh bandekar ) महाराष्ट्राच्या घरात पोहचले. अभिनयाशिवाय ते राजकारण, सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेत काहीजण लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. आदेश बांदेकर यांचा मी नातेवाईक आहे असे सांगून काही जणांशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सोशल मीडियावरून सर्वांना सर्तक राहण्याचे आवाहान केले आहे. आदेश बांदेकर यांनी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, “बांदेकर” हे आडनाव किंवा या आडनावाशी साध्यर्म साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असे सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नसेल. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना सर्तक राहण्याचे आवहान केले आहे.आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर  (soham bandekar ) याने देखील यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्याकडून देखील अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

आदेश बांदेकर नेहमीच कलाकारांच्या मदतीसाठी पुढे असतात. काही दिवसांपूर्वी पांडू चित्रपटानिमित्त कुशल बद्रिके यांना होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी आदेश बांदेकर यांनी माझी मदत केली होती. हे सांगताना कुशल भावुक झालेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे आदेश बांदेकर कोणाची फसवणूक करणार नाहीत अशी खात्री तमाम प्रेक्षकांना आहे. वाचा- BBM फेम विशाल निकम-सोनाली पाटील पुन्हा एकत्र, VIDEO होतोय तुफान VIRAL अशाप्रकराच्या फसवणूकिचा प्रकार अभिनेते भरत जाधव यांच्याबाबतीत देखील घडला होता. त्यांच्या देखली नावाच गैरवापर करण्यात येत होता. भरत जाधव यांना हे समजल्यानंतर त्यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट लिहित याबद्दल आवाहन केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात