‘चला भाजपाला दाखवूया त्यांची जागा’; प्रसिद्ध अभिनेत्रीची TMC मध्ये एंट्री

‘चला भाजपाला दाखवूया त्यांची जागा’; प्रसिद्ध अभिनेत्रीची TMC मध्ये एंट्री

टीएमसी (TMC) आणि भाजपा (BJP) या दोन्ही पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय सेलिब्रिटींना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र या कलाकारांमध्ये बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

  • Share this:

मुंबई 3 मार्च: पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. (West Bengal Assembly Election) राजकीय दृष्टया संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार आहे. परिणामी राजकीय पक्षांच्या प्रचाराला देखील जोर चढला आहे. टीएमसी (TMC) आणि भाजपा (BJP) या दोन्ही पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय सेलिब्रिटींना निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र या कलाकारांमध्ये बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सायंतिका टीएमसी पक्षासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे.

टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिकानं पक्षात प्रवेश केला. टीएमसीमध्ये प्रवेश करताच तिनं भाजपावर जोरदार निशाणा साधला. “मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. परंतु खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हिच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. आम्हाला केवळ बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. चला भाजपाला त्यांची जागा दाखवूया.” अशा आशयाचं भाषण करत सायंतिकानं भाजपावर जोरजार टीका केली.

अवश्य पाहा - West Bengal Elections: ’बंगालची मुलगीच बंगालला हवी', जुनं ट्वीट लक्षात ठेवा म्हणत प्रशांत किशोर यांचा एल्गार

यापूर्वी मनोज तिवारी, जून मालिया, राज चक्रवर्ती, कंचन मलिक, सुदेशना रॉय, सयोनी घोष या कलाकारांनी ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार केला होता.

माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. १८.६८ कोटी नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. २.७ लाख मतदान केंद्र असणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक २९४, तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुदुचेरीत ३० विधानसभा जागांसाठी मतदान होईल. नोव्हेंबर २०२० मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता करोनाकाळात या पाच राज्यांमध्ये निवडणूक होत आहे.

Published by: Mandar Gurav
First published: March 3, 2021, 2:21 PM IST

ताज्या बातम्या