जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; डॉक्टरांची वेट अँड वॉच भूमिका

Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; डॉक्टरांची वेट अँड वॉच भूमिका

Lata Mangeshkar Health Update : लता दीदींच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; डॉक्टरांची वेट अँड वॉच भूमिका

कोरोनाबरोबरच न्युमोनियाही झालेला असल्यानं प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जानेवारी : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आठवडाभरापूर्वीपासून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital Mumbai) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Lata Mangeshkar Health Update Important update on Lata Didis health) मात्र भारतरत्नं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. दीदींना लवकर बरं वाटावं यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून ब्रीच कँडी रूग्णालयातील आयसीयूमध्ये लतादीदींवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबरोबरच न्युमोनियाही झालेला असल्यानं प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. उपचारांना थोडाबहुत प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षेइतकी प्रकृतीत सुधारणा नाही. उपचार करणा-या डॉक्टरांची वेट अँड वॉचची भूमिका आहे. लता दीदींना ११ जानेवारी रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ब्रिच कँडी रूग्णालयातील ICU मध्ये दाखल केले होते. याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. हे ही वाचा- Lata Mangeshkar यांच्या प्रकृतीत सुधारणा, ICU मध्ये लतादीदींवर उपचार सुरु लता दीदींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. प्रत्येक भारतीयांच्या मनात लता दीदींचं अढळ असं स्थान आहे. आपल्या आवाजाने त्यांनी प्रत्येक पिढीला भूल घातली आहे. त्यामुळे अशी गान कोकिळा लवकरात लवकर बरी होऊन घरी जावी यासाठी प्रत्येक भारतीय आज प्रार्थना करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात