मुंबई 15 मार्च: कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) वाढत्या संख्येमुळं गेल्या काही काळात शेतकरी आंदोलनाची (Indian farmers protest) चर्चा हळूहळू मागे पडू लागली होती. परंतु २६ जानेवारी रोजी झालेल्या प्रकारानंतर काहीसं थंडावलेलं शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा पेटलं. अन् या आंदोलनाचे पडसाद नुकत्याच झालेल्या जगप्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले. हॉलिवूड गायिका लिली सिंग हिनं (Lilly Singh) ग्रॅमी रेड कार्पेट सोहळ्यात ‘स्टँड विथ फार्मर्स’ हा मास्क परिधान करुन भारतातील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला.
ग्रॅमी हा संगीत विश्वातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. नुकत्यात झालेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात गायिका लिली सिंग हिनं देखील हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं I stand with farmers असा मजकुर लिहिलेला मास्क परिधान केला होता. या मास्कच्या माध्यमातून तिनं भारतातील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा - एक वेळच्या अन्नसाठी हनी सिंग करायचा संघर्ष; या गाण्यामुळं झाला करोडपती
View this post on Instagram
लिलीची ही पोस्ट काही तासांत सोशल मीडियावर व्हायरल झाली. या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनीही आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर अशा दिल्लीच्या सीमांवर एकत्र येऊन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Farmers protest, Rock music, Youtubers