• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शिवा काशिद साकारणं किती कठीण होतं? विशालनं सांगितला 'जय भवानी जय शिवाजी'चा अनुभव

शिवा काशिद साकारणं किती कठीण होतं? विशालनं सांगितला 'जय भवानी जय शिवाजी'चा अनुभव

ही भूमिका साकारणं दिसतं तितकं सोपं नव्हतं. यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली. हा अनुभव त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई 18 जुलै: छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पराक्रमाचं दर्शन घडवणारी आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जय भवानी जय शिवाजी (Jai Bhawani Jai Shivaji) असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या व्हिडीओमध्ये सर्वच कलाकार उत्तम अभिनय करताना दिसत आहेत. मात्र यामध्ये अभिनेता विशाल निकमनं (Vishhal Nikam) सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. तो यामध्ये शिवा काशिद (Shiva Kashid) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. परंतु ही भूमिका साकारणं दिसतं तितकं सोपं नव्हतं. यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागली. हा अनुभव त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मराठी सिनेसृष्टीत मानाचा तुरा; 'काळी माती'ला जगभरात तब्बल 301 पुरस्कार ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत विशालनं शिवा काशिद साकारताना आलेले अडथळे सांगितले. तो म्हणाला, “जय भवानी जय शिवाजी या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच आहे. कारण खूप कमी कलाकार असतात ज्यांना अशा संस्मरणीय भूमिका साकारण्याची संधी मिळते. मी यापूर्वी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारलेल्या नाहीत. त्यामुळे मालिकेच्या निमित्तानं मला वेगळाच अनुभव मिळाला. खूप काही शिकता आलं. मी सर्व प्रथम त्याकाळच्या भाषेचा अभ्यास केला. त्या भाषेचा लहेजा समजून घेतला. सोबतच शिवचरित्र, आणि शिवा काशिद या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला. काही इतिहास संशोधकांना भेटलो. त्यांच्या दृष्टिकोनातून शिवाचं व्यक्तिमत्व कसं असावं हे जाणून घेतलं. त्यानंतर दिग्दर्शक आणि लेखकांच्या मदतीने मी ही व्यक्तिरेखा साकारली.” KGF Chapter 2 च्या टीजरने बनवला नवा रेकॉर्ड; मिळाले तब्बल इतके views शिवा काशीद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असं म्हटलं जातं.
  Published by:Mandar Gurav
  First published: