Home /News /entertainment /

KGF Chapter 2 च्या टीजरने बनवला नवा रेकॉर्ड; मिळाले तब्बल इतके views

KGF Chapter 2 च्या टीजरने बनवला नवा रेकॉर्ड; मिळाले तब्बल इतके views

KGF 2

KGF 2

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने 16 जुलै ही चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र कोरोना महामारीमुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही.

    मुंबई, 18 जुलै- साऊथ सुपरस्टार (South Superstar) यशचा (Yash) KGF हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले होते. या चित्रपटाच्या यशानंतर KGF Chapter 2 चीसुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनचं चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. नुकताच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. आणि KGF Chapter 2 च्या या टीजरनेसुद्धा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. साऊथ सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित KGF Chapter 2 या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नीलने 16 जुलै ही चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. मात्र कोरोना महामारीमुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. कोरोनामुळे सतत चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात येत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी, या चित्रपटाचा एक टीजर जानेवारीमध्ये रिलीज करण्यात आला होता. या टीजरने नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. KGF Chapter 2 चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सतत पाहण्यात येत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीजरने एक नवा रेकॉर्ड केला आहे. (हे वाचा: शूटिंगबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या प्रोड्यूसर्संना दिल्या 'या' विशेष सूचना ) जानेवारी 2021 मध्ये KGF Chapter 2 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलर पाहूनचं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र कोरोना परिस्थितीमुळे चित्रपट प्रदर्शनाची वेळ सतत पुढे पुढे ढकलली जात आहे. मात्र हा ट्रेलर इतका लोकप्रिय ठरत आहे, की या ट्रेलरचे यूटयूबवर आत्तापर्यंत 200 मिलियन व्युव्हज आले आहेत. म्हणजेच हा टीजर तब्बल 20 करोड लोकांनी पाहिला आहे तर 8.4 मिलियन लाईक्ससुद्धा मिळाले आहेत. अशा पद्धतीने KGF Chapter 2 च्या ट्रेलरने नवा रेकॉर्ड केला आहे. यशच्या चाहत्यांना या चित्रपटाची खुपचं उत्सुकता लागून आहे. टीजरनंतर आता चित्रपट कधी पाहायला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South film

    पुढील बातम्या