जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vishakha Subhedar: 'उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचंय', शुभेच्छा देत अभिनेत्रीनं समीर चौघुलेवर सोपवली मोठी जबाबदारी

Vishakha Subhedar: 'उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचंय', शुभेच्छा देत अभिनेत्रीनं समीर चौघुलेवर सोपवली मोठी जबाबदारी

Vishakha Subhedar: 'उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचंय', शुभेच्छा देत अभिनेत्रीनं समीर चौघुलेवर सोपवली मोठी जबाबदारी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले (Samir Choughule) या अवली आणि अप्रतिम अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या या स्पेशल दिवशी त्याच्या हास्यजत्रेतील पार्टनरने नेमकं काय लिहिलं आहे वाचा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 29 जून: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला समीर चौगुले (Samir choughule birthday) या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. समीरला या कार्यक्रमात हास्यमहाराथी असं सुद्धा म्हणलं जात. समीरने अक्षरशः या कार्यक्रमात धुमाकूळ घातला आहे हे काही नवं नाही. हास्यजत्रेच्या अनेक कलाकारांनी आज समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण अभिनेत्री आणि समीरची हास्यजत्रेची पार्टनर असणाऱ्या (Vishakha Subhedar) विशाखा सुभेदार या अभिनेत्रीच्या शुभेच्छा मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. हास्यजत्रा कार्यक्रमात समीर आणि विशाखाची जोडी प्रचंड प्रसिद्ध होती. अनेक सिझन या जोडीच्या वेगवेगळ्या स्किटने लोकांना अक्षरशः लोटपोट करून सोडलं होतं. आता हास्यजत्रा कार्यक्रमाचा सीजन जरी संपला असला तरी समीर आणि विशाखा यांचं बॉण्डिंग मात्र तसंच आहे. विशाखाने तिच्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे, “सम्या… वेड्या माणसा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. ह्या गेल्या काही वर्षांत आपण एकत्र काम असताना,तुझ्याकडून खूप ऊर्जा मिळाली,प्रेसेन्स ऑफ mind, इन्स्टंट ह्या सारख्या अनेक गोष्टी शिकले..खूप काही share केलंय आपण… एक मंच अनेक वर्ष share केला..! तू उत्तम हाडाचा कलाकार आहेस मित्रा. तुझ्यातला लेखक दिवसेंदिवस स्फूरत चालल्ला आहे..! आत्ता तुला मागे वळून बघायची गरज नाही..खूप आनंदात, सुखात रहा. कारण उभ्या महाराष्ट्राला तुला आनंदात ठेवायचं आहे.. सगळ्यांनाच्या गळ्यातला ताईत झाला आहेस तू..! आपल्या जोडीने खूप छान छान प्रसंग अनुभवले आहेत..आपण भांडलो, रुसलो, हट्टी वागलो, हिरमूसलो, हसलो,मस्ती केली, खोड्या फाजील काढल्या, किस्से.आणि प्रेमही तितकेच.टॉम अँड जेरी सारखं… 💞सम्या जे जे तुला हवं ते ते तू मिळवतोच.. त्यामुळे ते तुला मिळेलच. तेरा होगया रे….. 👏👏👏 तू जीत गया रे…मनापासून शुभेच्छा.. सम्या. love u दोस्ता.’

जाहिरात

समीर चौगुले या अभिनेत्याचं विनोदी टायमिंग चुकलं असं अगदी क्वचितच झालं असेल. समीरने हास्यजत्रेत स्वतःची न पुसता येणारी ओळख निर्माण केली आहे. दरवाजाची बेल, सनई असे हिडन टॅलेंट सुद्धा तो स्किटमध्ये वापरून मजा आणतो. तो एक यशस्वी अभिनेता आहे, लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. हे ही वाचा-  ‘एखाद्या अभिनेत्याच्या तोंडची वाक्यं’,‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेबाबत काय म्हणाला प्रसाद ओक

 समीर आणि विशाखा या जोडीने आजवर अनेक कमाल स्किट सादर केले आहेत. समीरच्या वाढदिवशी त्याच्या टॅलेण्टचं कौतुक करत विशाखाने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राला कायम हसतमुख ठेवायची मोठी जबाबदारी सुद्धा तिने सोपवली आहे. आणि समीर ही कामगिरी अगदी सहजपणे पेलू शकतो असा विश्वास तिला आणि समीरच्या सगळ्या चाहत्यांना सुद्धा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात