Home /News /entertainment /

लॉकडाऊनमध्ये सुश्मिता सेननं सांगितली तिची 'लव्ह स्टोरी', पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये सुश्मिता सेननं सांगितली तिची 'लव्ह स्टोरी', पाहा VIDEO

सुश्मिता सेननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिची लव्ह स्टोरी सर्वांना सांगितली आहे.

  मुंबई, 20 मे : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. सध्या सुश्मिता तिच्या कुटुंबासोबत टाइम स्पेंड करत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर असलेली सुश्मिता सोशल मीडियावर मात्र बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती नेहमीच तिच्या लाइफबद्दल तिच्या चाहत्यांना सांगत असते. काही दिवसांपूर्वीच सुश्मितानं तिच्या आजारपणाबद्दल मोठा खुलासा केला होता. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिची लव्ह स्टोरी सर्वांना सांगितली आहे. सुश्मिता सध्या तिचा लॉकडाऊनचा काळ तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि तिच्या दोन मुलींसोबत स्पेंड करत आहे. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिच्या मुली एलिजा आणि ऋने पियानोवर काही ट्यून्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. सुश्मितानं तिच्या मुलींचा हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'माझी लव्ह स्टोरी, I Love You Guys' बोनी कपूर यांच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना, वडीलांसह जान्हवी-खुशी क्वारंटाइन
  View this post on Instagram

  My #lovestory ❤️I love you guys!!! #duggadugga

  A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

  या व्हिडीओमध्ये सुश्मिताची लहान मुलगी एलिजा आपली मोठी बहीण ऋनेला गाइड करताना दिसत आहे. सुश्मिताचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर तिचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी सुश्मिता तिच्या एका बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. तिनं तिच्या स्पोर्ट बाइकवर पोज देतानाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात ती ब्लॅक कलरच्या आऊटफिट्समध्ये दिसली होती.
  या शिवाय सुश्मिता तिच्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असते. अद्याप अविवाहित असेलेली सुश्मिता दोन मुलींची आई आहे. तिनं या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. मागच्या काही काळापासून ती मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर रोहमन आणि मुलींसोबतचे फोटो शेअर करत असते. 'मला रोज जाणीव करुन दिली जाते...' घटस्फोटावर नवाझुद्दीनच्या पत्नीनं सोडलं मौन बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत, आईनं केला मोठा खुलासा
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sushmita sen

  पुढील बातम्या