जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सासू पडली सुनेवर भारी! समीरा रेड्डीचा डान्स Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा

सासू पडली सुनेवर भारी! समीरा रेड्डीचा डान्स Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा

सासू पडली सुनेवर भारी! समीरा रेड्डीचा डान्स Video ची सोशल मीडियावर होतेय चर्चा

समीरा रेड्डीचा तिच्या सासूसोबतचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च : बॉलिवूडचे अनेक कलाकार असे आहेत जे मोठ्या पडद्यापासून बऱ्याच काळापासून दूर आहेत पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र चाहत्यांशी सतत संवाद साधताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री आहे समीरा रेड्डी. लग्नानंतर समीरा बॉलिवूडपासून जवळजवळ दूरच गेली. पण तरीही ती सोशल मीडियावर मात्र खूप सक्रिय असते. दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळी तिचं अंडर वॉटर फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं. पण आता तिनं तिच्या सासूसोबतचा असा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्यापेक्षा सासूचीच चर्चा सोशल मीडियावर जास्त सुरू आहे. समीरानं तिच्या सासूसोबतचा एक डान्स व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ फ्लिप द स्विच चॅलेजचा भाग आहे. या व्हिडीओमध्ये समीरा एक ब्लॅक कॉस्ट्यूम घालून डान्स करताना दिसत आहे. तर तिची सासू ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस घालून तिचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. तर या व्हिडीओच्या फ्लिपमध्ये समीराची सासू ब्लॅक कॉस्ट्यूममध्ये डान्स करताना दिसत आहे आणि समीरा तिचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. ‘5 मुलांना डेट करणं हा तिचा स्वतःचा निर्णय’, बिनधास्त वक्तव्यामुळे फसली नेहा

जाहिरात

समीरा रेड्डीनं हा व्हिडीओ तिच्या सासूबाई मंजरी वर्दे यांच्यासोबत शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये सासू-सुनेची क्यूट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना समीरानं लिहिलं, ‘फ्लिप द स्विच’ या पोस्टमध्ये तिनं सासू मंजरी वर्दे यांनाही टॅग केलं आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट केल्या आहेत. ज्यात अनेकांनी तिच्या सासूच्या डान्सचं कौतुक केलं आहे. ब्रँडेड घड्याळांचे चाहते आहेत हे बॉलिवूडकर, या किंमतीत तुम्ही मुंबईत घ्याल घर

2014 मध्ये समीरा रेड्डीनं तिचा लॉन्ग टर्म बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन अक्षय वर्देशी लग्न केलं होतं. लग्नाच्या आधी जवळापास 3 वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर 2015 मध्ये समीरानं एका मुलाला जन्म दिला आणि आठ महिन्यांपूर्वीच ती पुन्हा एकादा आई झाली असून ती नेहमीच तिच्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ‘वेबसीरिज गर्ल’ मिथिला पालकरच्या HOT बिकिनी लुकवर चाहते क्लिनबोल्ड!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात