मुंबई, 31 डिसेंबर : जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बॉयफ्रेंड सोबत न्यू ईयर व्हेकेशनवर आहे. नुकतेच तिनं या व्हेकेशनचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती स्विमिंग पूलच्या बाजूला बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. यावेळी तिनं ब्लॅक कलरची बिकिनी घातली होती. तिचे हे फोटो पाहिल्यावर भाऊ टायगरही कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. कृष्णा श्रॉफचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोमध्ये तिचा फिटनेस एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रीला लाजवेल असाच आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड फुटबॉलपटू एबन सुद्धा दिसत आहे. कृष्णाच्या या फोटोंवर कमेंट करण्याचा मोह भाऊ टायगरलाही आवरला नाही आणि त्यानं लिहिलं, ‘बिच्चारा एबन’ ‘तू माझा पुन्हा एकदा विश्वासघात केलास’, सैफ अली खानवर भडकली काजोल
कृष्णा श्रॉफ भाऊ टायगर सारखीच फिटनेस फ्रिक आहे. ती अनेकदा टायगरसोबतचे जिममधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फुटबॉलपटू एबन आणि कृष्णा एका पार्टीमध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हापासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. मागच्या 4 महिन्यांपासून हे दोघंही नात्यात आहेत. मात्र कृष्णानं त्यांचं नातं कधीच कोणापासून लपवलं नाही. रेल्वे स्टेशनवरील तरुणाच्या गाण्याने रानू मंडललाही टाकलं मागे, VIDEO VIRAL
अशाप्रकारे बोल्ड फोटो शोअर करण्याची कृष्णाची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अनेकदा बॉयफ्रेंडसोबतचे बोल्ड किंवा बिकिनी फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूडपासून दूर असलेली कृष्णा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अभिनय क्षेत्रात नसतानाही सोशल मीडियावर तिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण…