जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तू माझा पुन्हा एकदा विश्वासघात केलास’, सैफ अली खानवर भडकली काजोल

‘तू माझा पुन्हा एकदा विश्वासघात केलास’, सैफ अली खानवर भडकली काजोल

‘तू माझा पुन्हा एकदा विश्वासघात केलास’, सैफ अली खानवर भडकली काजोल

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा तान्हाजीच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या तिचा आगामी सिनेमा तान्हाजीच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या सिनेमात ती अजय देवगणच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एवढंच नाही तर हा सिनेमा मराठी भाषेतही रिलीज होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून काजोल आणि अजय या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. पण मध्येच असं काही झालं आहे की काजोलनं सैफ अली खानवर विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवरील पोस्टमधून तिनं आपला रागही व्यक्त केला आहे. काजोलनं ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं, तू ओमकारामध्येही माझा विश्वासघात केला होतास आणि आता प्रमोशनच्या वेळीही तेच केलंस… अशा करते की तू स्वित्झर्लंडमध्ये हे वाचत असशील. त्यानंतर काही काळानं तिनं हे ट्वीट डिलीटही केलं आहे. या ठिकाणी काजोल तान्हाजी सिनेमाच्या प्रमोशन बद्दल बोलत आहे. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यावर लगेचच सैफ त्याच्या फॅमिलीसोबत व्हेकेशनसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाला. करिना कपूर आणि करिश्मा कपूर या व्हेकेशनचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर दुसरीकडे सिनेमाचं प्रमोशन सोडून फिरायला जाणं काजोलला फारसं आवडलेलं नाही. टायगर श्रॉफ नाही तर हा अभिनेता होता दिशा पाटनीचं पहिलं प्रेम, पण…

जाहिरात

काजोलनं रागात सैफसाठी हे केलं असलं तरीही हा राग सुद्धा मैत्रीतला आहे. तान्हाजी सिनेमात सैफ अली खान खलनायक उदयभान राठोडची व्यक्तिरेखा साकारत आहे. अजय देवगण मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 10 जानेवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू असलं तरीही सैफला त्याची अजिबात चिंता नाही आहे. तो त्याच्या फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं समजताच बिग बींच्या मनात आली शंका, पाहा VIDEO सर्जरी की मेकअपची जादू? कसा लपवला दीपिका पदुकोणने RK टॅटू?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात