Home /News /entertainment /

'गुटखा किंग' म्हटल्यावर अभिनेता भडकला, ट्विटर युजरची ऑनलाइनच घेतली शाळा

'गुटखा किंग' म्हटल्यावर अभिनेता भडकला, ट्विटर युजरची ऑनलाइनच घेतली शाळा

सुनील शेट्टीने त्या ट्विटर युजरला त्याची चूक सांगितली तेव्हा युजरला त्याची माफी मागावी लागली. शिवाय तो सुनील शेट्टीचा चाहता असल्याचेही स्पष्टीकरण त्याने दिले आहे

    मुंबई, 10 मे: अभिनेता सुनील शेट्टीला (Suniel Shetty Twitter) एका व्यक्तीने तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीवरून लक्ष्य केले होते. अजय देवगण, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्यावर तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात करण्याबाबत टीका करताना त्या व्यक्तीने चुकून अजयऐवजी सुनीलला टॅग केले होते. जेव्हा सुनीलने ट्विटर युजरला त्याची चूक सांगितली तेव्हा युजरला त्याची माफी मागावी लागली. शिवाय तो सुनील शेट्टीचा चाहता असल्याचेही त्याने सांगितले. अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख खान असणाऱ्या तंबाखू ब्रँडच्या होर्डिंगचा फोटो शेअर करत एका युजरने या जाहिरांतींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना एकाने अजयऐवजी सुनील शेट्टीला टॅग केले आहे. हा फोटो शेअर करत एका ट्विटर युजरने असे म्हटले होते की, 'हायवेवर इतक्या जाहिराती पाहिल्यानंतर आता मला गुटखा खावासा वाटत आहे.' यावर कमेंट करताना दुसऱ्या एका युजरने असे लिहिले की, 'अरे भारताचे गुटखा किंग शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी.. देशाचे चुकीच्या मार्गाने नेतृत्त्व करत आहात त्यामुळे तुमच्या मुलांना तुमची लाज वाटली पाहिजे. भारताला कर्करोगाच्या देशाकडे नेऊ नका.' सुनील शेट्टीने जेव्हा हे ट्वीट पाहिले तेव्हा त्याने हात जोडण्याचे इमोजी पोस्ट करत असे म्हटले की, 'भावा तू तुझा चष्मा नीट कर किंवा बदल'. सुनील शेट्टीच्या उत्तरानंतर या ट्विटर युजरने असे म्हटले आहे की, 'नमस्कार सुनील शेट्टी. माफ करा हा टॅग चुकून झाला आहे. भाई माझा तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, खूप सारं प्रेम. याठिकाणी अजय देवगण असायला हवा होता. मी तुझा खूप मोठा फॅन आहे त्यामुळे तुझं नाव टॅग्समध्ये सर्वात आधी येतं.' अशाप्रकारे स्पष्टीकरण देत या युजरने सुनील शेट्टीची माफी मागितली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Ajay devgan

    पुढील बातम्या