लेक पडतेय आईवर भारी! लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा BOLD सेल्फी व्हायरल

लेक पडतेय आईवर भारी! लॉकडाऊनमध्ये श्वेता तिवारीच्या मुलीचा BOLD सेल्फी व्हायरल

अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधीच पलक तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते.

  • Share this:

मुंबई, 23 मे : सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनुळे सर्वांनाच घरी बसावं लागत आहे. पण सोशल मीडियानं हे काम थोडं सोपं केलं आहे. आजकाल सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले आहेत. मग ते सामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी. सध्या सोशल मीडिया हा या सर्वांना जोडून ठेवणारा दुवा ठरत आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सर्वजण त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. अशात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पलकचा जन्म 2000 मध्ये झाला. 20 वर्षीय पलक त्या स्टार किड्सपैकी एक आहे. ज्यांचा चाहता वर्ग एखाद्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधीच पलक तिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिनं काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये व्हाइट ड्रेसमध्ये बेडवर बोल्ड पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमधील तिचा अंदाज एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

लॉकडाऊनमध्ये मालिकेतील सुसंस्कृत सूनेच्या BOLD PHOTOSची तुफान चर्चा

 

View this post on Instagram

 

Quite literally a bed head

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये पलकनं लिहिलं, 'Quite literally a bed head.' या फोटोंमधील पलकचं सौंदर्य आणि तिच्या बिनधास्त अंदाजाचं खूप कौतुक होत आहे. अनेकांनी तिच्या मेकअपची तुलना काइली जेनरच्या लुकशी केली आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या एवढे पसंतीच उतरले आहेत की, हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Featuring tobbo’s lil paw

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii) on

पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा तिच्या आणि श्वेता तिवारीच्या फोटोंची तुलना सोशल मीडियावर होताना दिसते. पलक ही श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा तिवारी यांची मुलगी आहे. पलकचा स्टायलिश लुक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो.

मनोरंजन उद्योग तात्पुरता ग्रीन झोनमध्ये हलवता येईल का? मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा

पाकिस्तानच्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलने गमावला जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: May 23, 2020 10:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading