जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पार्टी करून परतत होती जान्हवी; फोटोग्राफर म्हणाला, ‘आप कहो तो घर तक भी आएंगे’

पार्टी करून परतत होती जान्हवी; फोटोग्राफर म्हणाला, ‘आप कहो तो घर तक भी आएंगे’

पार्टी करून परतत होती जान्हवी; फोटोग्राफर म्हणाला, ‘आप कहो तो घर तक भी आएंगे’

जान्हवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 फेब्रुवारी : अभिनेत्री जान्हवी कपूर मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. लवकरच ती ‘कारगिल गर्ल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी नुकतीच तिच्या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांच्या बर्थ डे पार्टीला गेली होती. ही पार्टी संपल्यावर घरी जाताना तिला फोटोग्राफर्सनी तिला घेरलं. एवढंच नाही तर ते तिला फॉलो सुद्धा करायला लागले. पण त्यानंतर जान्हवी सोबत असं काही घडलं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात जान्हवी पार्टीमधून निघून तिच्या कारकडे जाताना दिसत आहे. त्याचवेळी काही फोटोग्राफर्स तिला फॉलो करायला सुरुवात करतात. फोटोग्राफर्स आपल्या मागे येत आहेत हे पाहून जान्हवी त्यांना विचारते, ‘तुम्ही असं कुठे पर्यंत चालत येणार आहात.’ त्यावर फोटोग्राफर तिला म्हणतो, ‘कार पर्यंत’ इतक्यात मागून कुणीतरी म्हणतं ‘तुम्ही म्हणाल तर आम्ही घरापर्यंत येतो.’ त्यावर जान्हवी हसू लागली आणि म्हणाली, ‘ठीक आहे, या’ बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली…

जाहिरात

जान्हवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यासोबतच सर्वजण तिच्या खेळकर स्वभावाचं कौतुक करत आहेत. या पार्टीसाठी जान्हवीनं ब्लॅक कलरचा टँक टॉप आणि ब्लू डिस्ट्रेस्ड जिन्स घातली होती. एरवी सुद्धा अनेका जान्हवी पॅपराजीशी हसून बोलताना दिसते. तसेच गरीब मुलांना मदत करताना दिसते. तापसीचा सिनेमा पहायचा की नाही, का होतोय #BoycottThappad सोशल मीडियावर ट्रेंड

जान्हवीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या ती तिच्या आगमी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. काही दिवसांपूर्वी तिनं गुंजन सक्सेना बायोपिकमधील तिचे फोटो शेअर केले होते. या सिनमाचे पोस्टर्स फार पूर्वीच रिलीज झाले आहेत. याशिवाय ती राजकुमार रावच्या ‘रुही अफजा’ या सिनेमात दिसणार आहे. तसेच करण जोहर सुद्धा त्याचा आगामी सिनेमा ‘तख्त’मध्ये जान्हवीचा महत्त्वपूर्ण भूमिका देण्याचा विचार करत आहे असं म्हटलं जातंय. पिझ्झा डिलिव्हरी बॉयनं अडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला अभिनेत्रीचा नंबर आणि…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात