मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रियांका आणि निक यांची रोमँटिक क्लिप VIRAL; फक्त शर्टमध्ये रोमान्स करताना दिसलं सेलेब्रिटी कपल

प्रियांका आणि निक यांची रोमँटिक क्लिप VIRAL; फक्त शर्टमध्ये रोमान्स करताना दिसलं सेलेब्रिटी कपल

प्रियांकाने Instagram वर हा व्हिडिओ स्वतःच शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा फक्त शर्ट घातलेला निक यात दिसतो. प्रियांकानेही तसाच शर्ट घातला आहे.

प्रियांकाने Instagram वर हा व्हिडिओ स्वतःच शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा फक्त शर्ट घातलेला निक यात दिसतो. प्रियांकानेही तसाच शर्ट घातला आहे.

प्रियांकाने Instagram वर हा व्हिडिओ स्वतःच शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा फक्त शर्ट घातलेला निक यात दिसतो. प्रियांकानेही तसाच शर्ट घातला आहे.

  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा पती निक जोनसबरोबरचा एक VIDEO स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला आहे. फक्त पांढऱ्या शर्टमध्ये प्रियांका आणि निक यामध्ये दिसतात. हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच VIRAL झाला आहे. प्रियांका आणि निक यांच्या रोमँटिक अंदाजातले फोटो मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. अशा प्रकारे एकमेकांवरील प्रेमाचं जाहीर प्रदर्शन करण्याला PDA (Public Display of Affection)असं हल्ली म्हटलं जातं. निक आणि प्रियांका त्यांच्या PDA साठी गेले काही दिवस चर्चेत आहेत. या व्हिडिओमुळे त्यात भरच पडली आहे. खरं तर प्रियांकाने Instagram वर स्वतःच शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून निक यात दिसतो. प्रियांकानेही तसाच फक्त शर्ट घातला आहे.
  View this post on Instagram

  OUT NOW! #WhatAManGottaDoVideo @nickjonas @jonasbrothers

  A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

  जोनास ब्रदर्सच्या नव्या व्हिडिओ अल्बमचा हा भाग आहे. काही दिवसांपूर्वी तिने या अल्बमचा कव्हर फोटोही शेअर केला होता. Whata man gotta do असं या व्हिडिओचं नाव आहे. प्रियांका जोनास ब्रदर्सच्या म्युझिक अल्बममध्ये दुसऱ्यांदा झळकते आहे. त्यामुळे I'm risky... he's the business असंही प्रियांकाने गमतीने लिहिलं होतं.
  View this post on Instagram

  I’m risky... he’s the business @nickjonas @jonasbrothers Coming soon. 1.17.20 pre order!! #WhatAManGottaDoVideo

  A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

  या अल्बमच्या प्रसिद्धीसाठीच ही रोमँटिक व्हिडिओ क्लिप प्रियांकाने शेअर केली असावी. अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनस याचं नवं गाणं रिलीज झालं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेलं What A Man Gotta Do नुकतंच रिलीज झालं. या गाण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. कारण हे गाणं निक आणि प्रियांकावर चित्रीत करण्यात आलं आहे. प्रियांकानं या गाण्याचे काही फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यानंतर आता रिलीज झालेलं हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या गाण्यात प्रियांका निकचा खूपच बोल्ड लुक पाहायला मिळत आहे. What A Man Gotta Do या गाण्याच्या सुरुवातीलाच निक फक्त शर्ट घालून डान्स करताना दिसत आहे. या पूर्ण गाण्यात तो प्रियांकाला इम्प्रेस करताना दिसत आहे. याशिवाय या गाण्यात निकचे भाऊ जो जोनस आणि केविन जोनस सुद्धा आपापल्या बायकोबरोबर दिसत आहे. या तिघांची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे. याअगोदर जोनस ब्रदर्सचं Sucker हे गाणं रिलीज झालं होतं. ज्यात हे भाऊ त्यांच्या बायकांसोबत दिसले होते. त्यांच्या या गाण्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ‘सकर’ गाण्याचं यश पाहून जोनस ब्रदर्सनी पुन्हा एकदा त्यांच्या पत्नींना आपल्या गाणाच्या व्हिडीओमध्ये घेतलं.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  पुढील बातम्या