Home /News /entertainment /

'लँड करा दे' मीममधील तरुण आठवतोय का? Alia Bhatt सह करतोय शूटिंग; पाहा VIDEO

'लँड करा दे' मीममधील तरुण आठवतोय का? Alia Bhatt सह करतोय शूटिंग; पाहा VIDEO

आलिया भट्टचा (Alia Bhatt Video Viral) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती विपिन कुमार साहूसोबत (Vipin Kumar Sahu Video) पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. विपिन कुमार साहू म्हणजे तो तरुण आहे ज्याचा पॅराग्लायडिंग व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता

पुढे वाचा ...
  मुंबई, 12 मे: आलिया भट्टचा (Alia Bhatt Video Viral) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती विपिन कुमार साहूसोबत (Vipin Kumar Sahu Video) पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. विपिन कुमार साहू म्हणजे तो तरुण आहे ज्याचा पॅराग्लायडिंग व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता आणि त्यावर मीम्सचा पाऊस पडला होता. आलियाने विपिनसोबत एका जाहिरातीत काम केले आहे. विपिनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चॉकलेट ब्रँडच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यातही तो आधीच्या पॅराग्लायडिंग व्हिडीओप्रमाणे घाबरताना दिसत आहे. मात्र यावेळी त्याच्यासह चक्क आलिया भट्ट (Alia Bhatt and Vipin Kumar Sahu Video) आहे. या व्हिडीओमध्ये विपिन कुमार साहूचा 'लँड करा दे' हा व्हिडीओ रिक्रिएट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, विपिन तोच शर्ट परिधान करून हवेत सेल्फी स्टिक पकडून पॅराग्लायडिंग करत आहे. यामध्ये त्याच्या मागे पॅराग्लायडिंग करण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीऐवजी आलिया भट्ट आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओतील डायलॉग बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ देखील फारच विनोदी असून चाहत्यांना काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या त्याच्या व्हिडीओची आठवण करुन देणारा आहे.
  हा व्हिडीओ शेअर करताना विपीनने लांबलचक कॅप्शन दिलं आहे. त्याने असं म्हटलं आहे की, 'कोण म्हणतं की एक मीम एखादी उंची गाठू शकत नाही? मीमचे आयुष्य फक्त 1-2 महिन्यांपुरते असते असं कोण म्हणतं? मूर्खपणाचे सर्व स्टिरियोटाइप तोडून आलिया भट्टसोबत शूटिंग करत आहे.' आलियासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना विपिनने लिहिले की, 'पहिल्या शॉटमध्ये मी घाबरलो होतो, कारण मी कल्पनाही करू शकत नाही की एक दिवस आम्ही दोघे एकत्र बसून गप्पा मारू.' त्याने हा व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहे.
  हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर विपीनने या व्हिडीओच्या शूटिंग दरम्यानचे Behind The Scene फोटो देखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये क्रोमावर आलिया आणि विपीन पॅराग्लायडिंगचे शूटिंग करताना दिसत आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Alia Bhatt

  पुढील बातम्या