जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Virajas Kulkarni: 'सिटी प्राइड कोथरुडला गेलो की...'; विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Virajas Kulkarni: 'सिटी प्राइड कोथरुडला गेलो की...'; विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Virajas Kulkarni: 'सिटी प्राइड कोथरुडला गेलो की...'; विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

अभिनेता विराजस कुलकर्णीनं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं सिटी प्राइड कोथरुडला गेली त्याला घरी गेल्यासारखं वाटतं असं म्हटलंय. असं काय आहे तिथे जिथे ज्यानं विराजसला घरी असल्यासारखं वाटतं?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जुलै: ‘माझा होशील ना’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराजय कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या हटके पोस्ट आणि त्यावरील कॅप्शन्सनी तो सर्वांचं लक्ष वेधून घेतो.  नुकतंच विराजसचं अभिनेत्री शिवानी रांगोळेबरोबर लग्न झालं. दोघेही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते अखेर काही माहिन्यांपूर्वीच दोघे विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर विराजसनं त्वरित काम सुरू केल आहे. दोघेही कामानिमित्त घराबाहेर असतात. त्याचप्रमाणे कुलकर्णी यांच्या घरात सगळेच कलाकार असल्यानं एकमेकांबरोबर फार कमी वेळ घालवत असतील असं म्हणायला हरकत नाही. विराजसला मात्र घरातून बाहेर पडल्यावर अशा ठिकाणी गेल्यावर घरीच असल्यासारखं वाटतं असं म्हणतोय आणि ते ठिकाण म्हणजे पुण्यातील सिटी प्राइड. विराजस असं का म्हणाला जाणून घ्या. कुलकर्णी यांच्या घरात आता सगळेच कलाकार एकत्र आले आहेत. विराजसची आई म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या देखील प्रसिद्ध अभिनेत्री आणि आता त्यांना सुन देखील मिळली तीही अभिनेत्रीचं. त्यामुळे या दोघी अभिनेत्री सासू सुनांची ऑफस्क्रिन चांगलीच कमेस्ट्री रंगली आहे. इतकचं नाही त्यांनी नुकतीच एकत्र एक अँड शुट केली आहे. ज्यात दोघींचा मराठमोळा अंदाज दिसून येतोय. दोघींनी एका साड्यांच्या ब्रँडसाठी कमाल फोटोशूट केलं आहे. त्यांच्या फोटोशूटचे होर्टिंग्स पुण्यात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच होर्टिंग्स सिटी प्राइड कोथरुड येथे देखील लावण्यात आले आहेत. तिथले सासू सुनांचे हे होर्डिंग्स पाहून ‘हल्ली सिटी प्राइड कोथरुडला गेलो की अचानक घरीच असल्यासारखं वाटतं…!’ असं विराजसनं म्हटलंय.

जाहिरात

हेही वाचा - Yashraj Mukhate: ‘रसोडे में कोन था’ फेम यशराज मुखाटेच्या आईला इंद्राजींची भुरळ विराजसनं मृणाल कुलकर्णी शिवानी या सासू सुनांच्या होर्डिंगबरोबर फोटो शेअर केला आहे. विराजसच्या पोस्टची नेहमीच चर्चा असते. यावेळी ही विराजसची पोस्ट वाचून चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलंय. एका चाहत्यानं म्हटलंय, ‘कॅप्शन ऑन पॉइंट आहे’. तर दुसऱ्यानं म्हटलंय, ‘कमाल आहेस तू’. या क्यूट कुलकर्णी फॅमिलीच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या नुकत्यात पावनखिंड सिनेमात दिसल्या होत्या. येत्या काळातही त्या शिवाजी महाराजांवर आधारीत नव्या सिनेमात दिसणार आहे. तर अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्या नव्या प्रोजेक्टच्या शुटींगमध्ये बिझी आहे. तसेच शिवानीची नवी वेब सिरीज देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात