जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Yashraj Mukhate: 'रसोडे में कोन था' फेम यशराज मुखाटेच्या आईला इंद्राजींची भुरळ

Yashraj Mukhate: 'रसोडे में कोन था' फेम यशराज मुखाटेच्या आईला इंद्राजींची भुरळ

Yashraj Mukhate: 'रसोडे में कोन था' फेम यशराज मुखाटेच्या आईला इंद्राजींची भुरळ

‘रसोडे में कोन था’ फेम प्रसिद्ध संगीतकार यशराज मुखाटेच्या आईचा एक व्हिडीओ सध्या व्हारल होत आहे. ज्यात काकू मराठी मालिकांचे अपडेट्स देताना दिसत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै: टेलिव्हिजनच्या मालिका म्हणजे घरातील आई मंडळींचा आवडता विषय असतो.  सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या तरुण पिढीपेक्षा घरातील आई, आजी, आत्याला टेलिव्हिजनवर काय सुरू आहे याची बिंत्तम अपडेट असते. केवळ आपल्याच घरातील आई नाही तर मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकारांच्या आयाही टेलिव्हिजनवरील मालिका पाहत असतात.  तुमच्या आमच्या प्रमाणे त्यांनाही मालिकेतील हँडसम अभिनेते आवडत असतात. ‘रसोडे में कोन था’ फेम संगीतकार यशराज मुखाटेच्या आईचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यशराज मुखाटेची आई मराठी टेलिव्हिजनच्या मालिका पाहत असते. यशराजनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आईचा ‘मन उडू उडू झालं’ मालिकेचं अपडेट देतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात काकूंना मालिकेतील इंद्रा आवडतो असं दिसून येत आहे. इंद्राला जेलमध्ये टाकल्यानंतर देशपांडे सर त्याला बाहेर काढून शिक्षा देतात तो सीन काकू यशराजला रंगवून सांगत आहेत.

जाहिरात

यशराजनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काकू म्हणतात, ‘मन उडू उडू झालंमध्येना देशपांडे सरांनी इंद्राचा जामीन भरुन त्याला जेलमधून बाहेर काढलं. आता मी तुला शिक्षा देतो असं म्हटलं आणि घरी येऊन त्याचा हात आपल्या लेकीच्या हातात दिला आणि सांगितलं आता ही तुझी आयुष्यराची शिक्षा’. काकू फार उत्साहाने मालिकेचे अपडेट यशराजला सांगताना दिसल्या. टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या मालिका आपल्या आयुष्याचा कसा अविभाज्य भाग आहेत हे यावरुन लक्षात येत आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अखेर अरुंधती-आशुतोषने नीलला रंगेहाथ पकडलं; यशची होणार निर्दोष सुटका? ‘आई मराठी मालिकांचे अपडेट सांगत आहे’, असं म्हणत यशराजनं आईचा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी काकूंचं कौतुक केलं आहे. ‘आमच्या घरीही असंच असतं’, असंही अनेकांनी म्हटलं आहे. यशराज मुखाटे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. हिंदी, मराठी टेलिव्हिजन, सिनेमा, बॉलिवूड, टॉलिवूड अशा सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. अनेक अनोखे एक्सपिरिमेंट तो सोशल मीडियावर करत असतो. ‘रसोडे में कोन था’, ‘पावरी हो रही’ सारख्या अनेक हिट गाण्यांनंतर यशराजने सिनेमांसाठी देखील गाणी केली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात