मुंबई, 10 जून- Bipolar Disorder ने पीडित असलेली हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनची तब्येत ढासळली. पुढील २४ तास तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनैनाची तब्येत ढासळत चालली होती. प्रकृतीत सुधार न आल्यामुळे डॉक्टरांनी तिला २४ तास देखरेखी ठेवण्याचा निर्णय घेतला. सुनैनाचा आजार नक्की काय आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे, पण सध्या वारंवार उद्भवत असलेल्या प्रकृती समस्येमुळे रोशन कुटुंबीय चिंतेत आहेत. …म्हणून मार्वलच्या थोरने आपल्या मुलीचं नाव ठेवलं ‘इंडिया’ सुनैनाने गेल्यावर्षी तिच्या डिप्रेशनबद्दल सांगितलं होतं. एका मुलाखतीत सुनैना म्हणाली की, ती अनेकदा यासाठी काउंसिलरकडे जाते. तसेच मानसिक आरोग्य आणि त्याच्याशी निगडीत आजारावर त्वरीत उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. तसेच मानसिक आजारांबद्दल जागरुकता पसरवण्याबद्दलही ती भरभरून बोलली. सुनैना म्हणाली की, टुबर्क्यलोसिस मेनिन्जाइटिस, वाढतं वजन आणि कर्करोगाशी या आजारांशी लढण्यासोबतच नात्यातल्या अपयशामुळे ती नैराश्यग्रस्त झाली. ती घरातून बाहेरही कुठे जायची नाही. या स्थितीत तिची डॉक्टरांनी फार मदत केली. Bigg Boss Marathi 2- दुसऱ्याच आठवड्यात मैथिली जावकर घराबाहेर काय आहे Bipolar Disorder? हा डिसऑर्डर एक मानसिक आजार आहे. यात व्यक्तीचा स्वभाव सतत बदलत असतो. या स्थितीत माणूस खूप जास्त उन्मादी होतो किंवा खूप जास्त निराश होतो. या आजारातून बरं होता येत नाही. अनेक वर्ष तर कधी कधी आयुष्यभर यावर उपचार चालतात. VIDEO : पुण्यात मुसळधार; अनेक रस्त्यांवर साचलं पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.