जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vikram Vedha Teaser: थरकाप उडवणारा ॲक्शनपट; हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'चा थक्क करणारा टीजर रिलीज

Vikram Vedha Teaser: थरकाप उडवणारा ॲक्शनपट; हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'चा थक्क करणारा टीजर रिलीज

Vikram Vedha Teaser: थरकाप उडवणारा ॲक्शनपट; हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'चा थक्क करणारा टीजर रिलीज

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या बहुप्रतीक्षित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीजर नुकतंच रिलीज झाला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑगस्ट-   बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या बहुप्रतीक्षित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा टीजर नुकतंच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा थ्रिलर टीजर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. सतत या चित्रपटाबाबत विविध अपडेट्स समोर येत असतात. दरम्यान आता चित्रपटाच्या टीजरने आणखीनच उत्सुकता वाढवली आहे. नुकतंच युट्युबवर ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. या टीजरची सुरुवात अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या सीनपासून होते. हे दोघेही तुरुंगात बसलेले दिसून येत आहेत. यामध्ये सैफ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे तर समोर आरोपीच्या रुपात हृतिक बसला आहे. त्यांच्यातील संवाद फारच रंजक वाटत आहे. टीजर सुरु होताच हृतिक सैफला म्हणतो एक कथा ऐकवतो, यासाठी लक्ष आणि धीर दोन्ही हवे. यावेळी ही कथा तुम्हाला आश्चर्यचकित करेल. त्यानंतर टीजरची सुरुवात होते. यामध्ये जबरदस्त ऍक्शन थ्रिलर सीन पाहायला मिळत आहेत. सोबतच रावणाचं दहनसुद्धा यामध्ये दाखवण्यात आलं आहे. टीजरमध्ये हृतिक सैफ अली खानला म्हणतो, चांगलं आणि वाईट यामधील एक निवडणं खूप सोपं आहे. परंतु या प्रकरणात दोन्हीही वाईट आहेत. हृतिक आणि सैफ एकमेकांच्या डोक्यावर बंदूक लावून उभे असलेलं पाहायला मिळत आहेत. या टीजरमध्ये दोघांचा जबरदस्त अभिनय दिसून येत आहे. या चित्रपटाचा टीजर अवघ्या काही मिनिटांतच चर्चेत आला आहे. रिलीजच्या अवघ्या 20 मिनिटातच साडे चार लाख लोकांनी हा टीजर पाहिला आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

**(हे वाचा:** Kamal Haasan Movie: 2 वर्षानंतर ‘इंडियन 2’ च्या शूटिंगला पुन्हा सुरुवात; सेटवर झाला होता भयानक अपघात ) वास्तविक ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच सर्वांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून आहे. साऊथ दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनीच हिंदी रिमेकचं दिग्दर्शन केलं आहे. साऊथ चित्रपटात अभिनेता आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आता हृतिक आणि सैफ यांची जोडी पडद्यावर काय कमाल करते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात