मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रत्युषा बॅनर्जीला डेट करत होता विकास गुप्ता; अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी केला मोठा खुलासा

प्रत्युषा बॅनर्जीला डेट करत होता विकास गुप्ता; अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी केला मोठा खुलासा

‘होय मी तिला डेट करत होतो, पण...’; मृत्यूनंतर 5 वर्षांनी प्रत्युषाबाबत मोठा खुलासा

‘होय मी तिला डेट करत होतो, पण...’; मृत्यूनंतर 5 वर्षांनी प्रत्युषाबाबत मोठा खुलासा

‘होय मी तिला डेट करत होतो, पण...’; मृत्यूनंतर 5 वर्षांनी प्रत्युषाबाबत मोठा खुलासा

    मुंबई 12 जून: विकास गुप्ता (Vikas Gupta) छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता, निर्माता म्हणून ओळखला जातो. बिग बॉसमधून प्रकाशझोतात आलेला विकास सध्या दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीमुळं (Pratyusha Banerjee) चर्चेत आहे. तिच्या मृत्यूनंतर जवळपास पाच वर्षांनी त्यानं तिच्याबाबत काही खळबळजनक खुलासे केले आहेत. प्रत्युषा त्याला बराच काळ डेट करत होती. (Pratyusha Banerjee death case) परंतु तो बाईसेक्शुअल असल्यामुळं तिनं त्याच्यासोबत ब्रेकअप केलं असं तो म्हणाला. सैफ-अमृताने लग्नाच्या 13 वर्षानंतर घेतला होता घटस्फोट; नवाबनं अभिनेत्रीला दिली होती मोठी रक्कम विकास कायमच आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळं चर्चेत असतो. अनेकदा मुलाखतींमध्ये तो टीव्ही सृष्टीतील कलाकारांवर व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करताना दिसतो. यावेळी त्यानं टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रत्युषाबाब काही खुलासे केले. तो म्हणाला, “मी आयुष्यात केवळ दोन मुलींना डेट केलं आहे. पहिल्या मुलीचं नाव त्यानं सांगितलं नाही. परंतु दुसरी प्रत्युषा होती. आम्ही बराच काळ एकमेकांना डेट करत होतो. परंतु मी बाईसेक्शुअल असल्यामुळं आमचं ब्रेकअप झालं. त्यावेळी सभोवतालच्या लोकांनी तिला माझ्याबाबत भडकवलं होतं. त्यामुळं आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले अन् आमचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ती दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडली अन् मी देखील शांतपणे तिच्या आयुष्यातून निघून गेलो.” त्याच्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय प्रत्युषाचा मृत्यू झाला त्यावेळी त्यानं हे का नाही सांगितलं? असा सवालही काही प्रेक्षक त्याला करत आहेत. ‘हिंदू अभिनेत्रीलाच काम द्या’; रामायणासाठी कोट्यवधींची मागणी केल्यामुळं करीना ट्रोल प्रत्युषा बॅनर्जीनं 2016 साली आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेता राहुल राज सिंह याला अटक करण्यात होती. त्यानं तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले होतं. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु तिचा कथित प्रियकर राहुल राज सिंह यानं लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवलं होतं असा कयास पोलिसांनी लावला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Tv actress, Vikas gupta

    पुढील बातम्या