जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘हिंदू अभिनेत्रीलाच काम द्या’; रामायणासाठी कोट्यवधींची मागणी केल्यामुळं करीना ट्रोल

‘हिंदू अभिनेत्रीलाच काम द्या’; रामायणासाठी कोट्यवधींची मागणी केल्यामुळं करीना ट्रोल

‘हिंदू अभिनेत्रीलाच काम द्या’; रामायणासाठी कोट्यवधींची मागणी केल्यामुळं करीना ट्रोल

‘करीना कपूरला बॉयकॉट करा’; कोट्यवधींच्या मानधनासाठी करीनानं रामायणावरील प्रोजेक्ट नेला लांबणीवर; संतापलेले नेटकरी करतायेत ट्रोल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जून**:** करीना कपूर (Kareena Kapoor Khan) ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या मुलामुळं गेला काही काळ ती बॉलिवूडपासून दूर होती. मात्र आता पुन्हा एकदा ती जोरदार पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. (bollywood movie) यासाठी तिनं वजन देखील कमी केलं आहे. करीनाकडे सध्या पाच ते सहा बिग बजेट प्रोजेक्ट आहेत. यापैकी एक चित्रपट तर रामायणावर आधारित आहे. (Ramayana) यामध्ये तिला सीता (Sita) ही मुख्य व्यक्तिरेखा साकारण्याची ऑफर मिळाली आहे. परंतु या भूमिकेसाठी तिनं तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळं हा प्रोजेक्ट लांबणीवर गेल्याची चर्चा आहे. हा प्रोजेक्ट लांबणीवर गेल्यामुळं काही नेटकरी संतापले आहेत. अन् त्यांनी करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूडमध्ये पुनरागम करणाऱ्या करीनाकडे सध्या एकामागून एक अनेक चित्रपट येत आहेत. यापैकी एक चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा करीनाला प्रचंड आवडली त्यामुळं तिनं लगेचच त्यासाठी होकार दिला. सुरुवातील तिनं या चित्रपटासाठी 10 कोटी रुपयांचं मानधन मागितलं होतं. अन् निर्मात्यांनी तेवढे पैसे देण्याची तयारी देखील दाखवली होती. परंतु आता तिनं आणखी दोन कोटी रुपये वाढवून 12 कोटी रुपये मागितले आहेत. जास्त पैशांची मागणी केल्यामुळं हा प्रोजेक्ट लांबणीवर गेला. मात्र यामुळं नेटकरी संतापले. फॅमिली मॅनच्या पत्नीचा बिकिनी अवतार; सोज्वळ प्रियमणीचे Photo पाहून नेटकरी अवाक

जाहिरात
जाहिरात
HBD: पुण्यातील नोकरदार कसा झाला देवमाणूस? पाहा किरण गायकवाडचा प्रेरणादायी प्रवास
जाहिरात
जाहिरात

“सीता ही एक पवित्र व्यक्तिरेखा आहे. हिंदू लोकांसाठी आदरास्थानी असलेल्या सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीनासारखी लालची अभिनेत्री घेणं चुकीचं आहे. या भूमिकेसाठी एक हिंदूच अभिनेत्री घ्या.” अशी मागणी संतापलेले नेटकरी करत आहेत. शिवाय #BoycottKareenaKhan असं म्हणत तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. हा चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात