मुंबई, 26 ऑगस्ट- ‘डिअर कॉम्रेड, अर्जुन रेड्डी, गीता गोविंद’ या साऊथ चित्रपटांतून अफाट लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा होय. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा लागून होती. विजयनं नुकतंच अभिनेत्री अनन्या पांडेसोबत ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं आहे. या चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळत असतानाच, बॉक्स ऑफिसवर मात्र सिनेमाने चांगली कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. या साऊथ सुपरस्टारच्या डेब्यू चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. लायगरच्या पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्ट समोर आला आहे. या आकड्यांनुसार विजयच्या पहिल्या हिंदी चित्रपटाने पहिल्याच दिवशी आमिर खान आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. अशा परिस्थितीत येत्या आठवड्यात हा चित्रपट चांगली कमाई करु शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. नुकतंच समोर आलेल्या ट्रेड रिपोर्ट्सनुसार, लायगरने पहिल्या दिवसात सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. AndhraBoxOffice.com च्या मते, चित्रपटाने पहिल्या दिवशी 24.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. काही अज्ञात कारणांमुळे लायगरच्या हिंदी व्हर्जनच्या रिलीजमध्ये विलंब झाला होता. परंतु चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग झाल्याने चित्रपटाची सुरुवात उत्कृष्ट झाल्याचं म्हटलं जात आहे.
#Liger :
— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) August 26, 2022
Great Morning but a barrage of targeted negativity surrounding it has impacted numbers from afternoon. What looked like a Very Good opening day in the morning turned out to be just Ordinary compared to high costs. Early morning verdicts from USA are damaging Industry. pic.twitter.com/bdPPKt9uUc
(हे वाचा: Vijay Deverkonda: विजय देवरकोंडानं कधीही कुणाला म्हटलं नाही I Love You Too, उघड केलं कारण ) समोर आलेल्या माहितीनुसार, ऍडव्हान्स बुकिंगमधून सुमारे 7 कोटींची कमाई झाली आहे. त्यापैकी 80 लाख रुपये हिंदी व्हर्जनमधून मिळाले होते. लायगर प्रदर्शित होण्यापूर्वीच विजय देवरकोंडाच्या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे सुमारे 16 हजार तिकिटे विकली गेली होती. मात्र, पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून विजय देवरकोंडा बॉलिवूडवर राज्य करेल असं म्हणता येणार नाही. चित्रपटाला प्रचंड नकारात्मक प्रतिकिया मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटाची कमाई पुढे वेग घेणार की मंदावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.