जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vijay Deverkonda: विजय देवरकोंडानं कधीही कुणाला म्हटलं नाही I Love You Too, उघड केलं कारण

Vijay Deverkonda: विजय देवरकोंडानं कधीही कुणाला म्हटलं नाही I Love You Too, उघड केलं कारण

Vijay Deverkonda: विजय देवरकोंडानं कधीही कुणाला म्हटलं नाही I Love You Too, उघड केलं कारण

विजय देवरकोंडाने त्याच्या खाजगी आयुष्याबाबत अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट-   साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या आपल्या ‘लायगर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तत्पूर्वी चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं आहे. दरम्यान, विजयने त्याच्या खाजगी आयुष्याबाबत अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. एका मुलाखतीत अभिनेत्यानं खुलासा करत सांगितलं की, तो कधीही कुणाला ‘आय लव्ह यू टू’ का म्हणत नाही. तसंच तो प्रेमावर विश्वास का ठेवत नाही?. पाहूया काय आहे नेमका रिपोर्ट. गेल्या अनेक दिवसांपासून विजय आणि रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या मीडियामध्ये खूप व्हायरल होत असतात. पण या दोघांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाहीय. दरम्यान, आता या अभिनेत्यानं प्रेमाबद्दल आपलं मत, करत यामुळे त्याच्या विचारसरणीत कसा बदल झाला, हे सांगितलं आहे. विजय देवरकोंडानं सांगितलं की, त्याला रिलेशनशिपची भीती वाटत होती. कारण त्याच्या वडिलांनी या गोष्टीला मूर्खपणा म्हटलं होतं. आणि या गोष्टीची तुलना पैशाशी केली होती. पैसा असेल तर सर्व काही आहे, असं त्यांचं मत असल्याचंही अभिनेता म्हणाला’. या मुलाखतीमध्ये विजयनं त्याच्या वडिलांचं प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल असलेल्या मतांबाबत सांगितलं आहे. ‘त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं होतं की, पैसा सर्व काही आहे आणि प्रेम मूर्खपणाचं लक्षण आहे. या जगात पैसाच सर्वकाही आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्याकडे सर्व काही आहे. लोक तुमच्यावर प्रेम करतील, तुमचा आदर करतील आणि तुमच्यासाठी काहीही करतील. ही गोष्ट त्यावेळी त्याच्या मनात घर करुन बसली आणि याच विचारात तो मोठा झाला. नात्यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्यामुळे जेव्हा कुणी त्याला आय लव्ह यू म्हटलं आहे तेव्हा त्यानं आय लव्ह यू टू कधीच म्हटलेलं नाहीय. या कारणामुळे विजय चांगलाच चर्चेत आला आहे. **(हे वाचा:** Pushpa 2 मध्ये रश्मिका मंदानाची दमदार भूमिका; समोर आली चित्रपटाबाबत मोठी अपडेट ) आपल्या आयुष्यात आलेल्या एका मुलीने त्याचं प्रेमाबद्दलचं मत बदलल्याचं विजयने सांगितलं. विजयनं सांगितलं की, अभिनेता झाल्यानंतर, तो एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.मात्र अभिनेत्यानं तिचं नाव उघड केलेलं नाहीय. रिलेशनशिपमध्ये असताना विजयला जाणवलं की, हा काही व्यवहार नसून प्रेम कोणाशीही निस्वार्थपणे करता येतो. परंतु हे नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा ब्रेकअप झाला होता. सध्या विजय रश्मिकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात