मुंबई, 29 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलीवूड नेपोटिझमबाबत चर्चा सुरू झाली. आता कोरोना लॉकडाऊनमध्ये काही चित्रपट ऑनलाइन म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत आणि यावरून आता पुन्हा बॉलीवूड नेपोटिझमचा मुद्दा उपस्थित झाला आहे. Disney+Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकूण सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’, आलिया भट्टचा ‘सडक -2’, अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’, सुशांत सिंहचा ‘दिल बेचारा’, कुणाल खेमूचा ‘लूटकेस’ आणि विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांची घोषणा करताना ऑनलाइन पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट, अजय देवगण, अभिषेक बच्चन यांचा समावेश होता. मात्र कुणाल खेमू (kunal khemu) आणि विद्युत जामवाल (vidyut jammwal) यांना सहभाही करून घेतलं नाही, याबाबत त्यांना माहितीही देण्यात आली नाही. हे वाचा - सुशांतला सलमान खानने दिली होती धमकी; गायकाचा VIDEO तून धक्कादायक आरोप विद्युत जामवालने ट्विट केलं आहे, त्यामध्ये त्याने आपला राग व्यक्त केला आहे. विद्युतने अप्रत्यक्षपणे बॉलीवूड नेपोटिझमलाच लक्ष्य केलं आहे.
विद्युत म्हणाला, “ही मोठी घोषणा नक्कीच आहे. सात चित्रपट रिलीज होत आहेत मात्र फक्त 5 फिल्म्स प्रमोशनच्या लायक असल्याचं समजण्यात आलं आहे. दोन चित्रपटांचा यात उल्लेखही नाही. हा खूप मोठा रस्ता आहे आणि हे चक्र असंच सुरू राहणार आहे” हे वाचा - #BoycottNetflix ट्विटरवर ट्रेंड, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप कुणाल खेमूनेही याबाबत ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे.
Izzat aur pyaar maanga nahi kamaya jaata hai. Koi na de toh usse hum chhote nahi hote. Bas maidaan khelne ke liye barabar de do chhalaang hum bhi oonchi laga sakte hai 🙏
— kunal kemmu (@kunalkemmu) June 29, 2020
“इज्जत आणि प्रेम मागून कमवली जात नाही. कुणी ती देत नसेल तर आम्ही छोटे नाही होत. फक्त खेळण्यासाठी मैदान सारखंच द्या. आम्हीदेखील मोठी उडी मारू शकतो”, असं कुणालनं म्हटलं आहे. विद्युत जामवाल आणि कुणाल खेमू या दोघांनीही हिंदी फिल्म इंडस्ट्रीत खूप स्ट्रगल करून आपली ओळख बनवली. तरीदेखील अजून त्या इंडस्ट्रीत जागा दिली जात नाही आहे. संपादन - प्रिया लाड