#BoycottNetflix ट्विटरवर ट्रेंड, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप

#BoycottNetflix ट्विटरवर ट्रेंड, हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'कृष्णा अँड हिज लीला' या सिनेमावर आता #BoycottNetflix ट्रेंड होत आहे. वाचा काय आहे प्रकरण...

  • Share this:

मुंबई, 29 जून : सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक सिनेमांची प्रदर्शनं लांबणीवर पडली आहेत. मात्र अशात काही सिनेमा मात्र OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. असाच एक चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. 'कृष्णा अँड हिज लीला' नावाचा हा साऊथ सिनेमा एक प्रेमकथा असून तो कोणताही पूर्वसूचना न देता निर्मात्यांनी नेटफ्लिक्सवर 25 जून रोजी प्रदर्शित केला आहे. मात्र आता या सिनेमावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या सिनेमामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप सोशल मीडियावरून होत आहे.

या सिनेमातील मुख्य भूमिकेचे नाव कृष्णा असून त्याच्या भोवती सिनेमाची कथा फिरते. कृष्णाचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सिनेमात दाखवण्यात आलं असून यापैकी एका मुलीचे नाव राधा असल्याचे दाखवण्यात आलं आहे. यावरुनच आता नेटफ्लिक्सने हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. त्यामुळेच आता नेटकऱ्यांनी BoycottNetflix हा हॅशटॅग वापरुन नेटफ्लिक्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

या सिनेमात हिंदू धर्मातील देवांची नावे प्रमुख भूमिकांना देऊन निर्मात्यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप नेटकरी करत आहे. सोमवार (29 जून 2020) सकाळपासून ट्विटवरुन या सिनेमावर नेटफ्लिक्सने बंदी आणावी आणि हिंदूंची माफी मागावी अशी मागणी करणारी अनेक ट्विट व्हायरल झाली आहेत. हजारोच्या संख्येने नेटकऱ्यांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केली आहेत.

'कृष्णा अँड हिज लीला' या सिनेमात कृष्णाची भूमिका अभिनेता सिद्धू जोन्नलगडने साकारली आहे. तर सिनेमातील तीन प्रमुख अभिनेत्रींमध्ये तेलगु सिनेमातील आघाडीच्या अभिनेत्री सीरत कपूर, श्रद्धा श्रीनाथ, शालिनी वाडनिलकट्टा यांचा समावेश आहे. कृष्णा या एका साधारण दिसणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. दिसायला साधारण असूनही आपल्या संवाद कौशल्याने कृष्णा तरुणींवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतो, असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळेच कृष्णाचे अनेक मुलींबरोबर प्रेमसंबंध असतात. अनेक मुलींबरोबर कृष्णाचे शरीरसंबंध असल्याचेही सिनेमात दाखवण्यात आलं आहे. या पैकी राधा (शालिनी), सत्या (श्रद्धा) आणि रुक्सार (सीरत) या मुलींबरोबर कृष्णाचे नाते कसे असते आणि त्यामधून कसा गोंधळ उडतो अशी एकंदर या सिनेमाची कथा आहे.

First published: June 29, 2020, 2:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading