मुंबई, 29 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (sushant singh rajput) आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. विशेषत: बॉलीवूड नेपोटिझमला जबाबदार धरलं जात आहे. अनेक सेलिब्रिटींवर आरोप लावले जात आहेत. आता अशातच सलमान खानने (salman khan) सुशांतला धमकी दिली होती, असा धक्कादायक आरोप एका गायकाने केला आहे.
बिहारमधील लोकगायक सुनील छैला बिहारी (sunil chhaila bihari) यांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी सलमानला जबाबदार धरलं आहे. त्यांनी युट्यबवर आपला व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये त्यांनी सलमान खानकडून सुशांतला वारंवार धमक्या येत होत्या असा आरोप केला आहे.
सुनील छैला म्हणाले, "गेल्या काही महिन्यांपासून सुशांत खूप अडचणीत होता आणि याचं कारण म्हणजे त्याला सातत्याने धमकी येत होत्या. त्यामुळे तो सतत आपला सिम कार्ड बदलत होता. एका महिन्यात त्याने जवळपास 50 सिम कार्ड बदललेत अशी माहिती आम्हाला मिळाली. कधी कधी तर तो दिवसाला दोन कार्डही बदलायचा. तरी धमक्या येणं बंद झालं नाही"
हे वाचा - सुशांत तू असं का केलं? धोनीची भूमिका साकारली मात्र त्याला समजू शकला नाहीस
"सलमान खान आणि त्याची गँग सुशांतला धमकी देत होते. सुशांतने सिम कार्ड बदललं की त्याची माहिती त्याचा मित्र संदीप सिंह सलमान गँगपर्यंत पोहोचवायचा. संदीप सिंहसारखे लोक जे अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात त्यांना सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांच्यासारख्या लोकांचा आपल्यावर आशीर्वाद असल्याशिवाय आपलं काही होणार नाही असं वाटतं. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ती लोकं असं करतात", असं सुनील छैला म्हणाले.
हे वाचा - Sushant Singh Rajput: पोलीस शोधताहेत नवा अँगल,यशराजच्या Casting Directorची चौकशी
दरम्यान ही आत्महत्या की हत्या हे तर आता तुम्हाला माहितीच आहे. मात्र याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सुनील यांनी केली आहे.
दिग्दर्शकानेही केले होते सलमानवर आरोप
याआधी दिग्दर्शक अभिनव कश्यपनेही त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. YRF सारख्या एजन्सींनीच सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. आपल्यालाही धमक्या येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
अभिनवने त्याच्या पोस्टमध्ये स्वतःचा अनुभव शेअर केला होता. "दबंग मेकिंगच्या वेळी माझ्यासोबतही हे सर्व घडलं आहे. सलमान आणि त्याच्या कुटुंबाने मला घाबरवलं, धमकावलं नाही तर त्यांनी माझं करिअर कंट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली आणि माझी नकारात्मक पब्लिसिटी केली गेली. माझ्या पर्सनल लाइफमध्ये अनेक चढ-उतार आले पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमकी देण्यात आली. मी त्यावेळी पोलीसांत तक्रार सुद्धा केली होती", असं अभिनव म्हणाला होता.
हे वाचा - दिग्दर्शक अभिनव कश्यपनं सलमान खानवर केले गंभीर आरोप, भाऊ अनुराग म्हणतो...
अभिनवने त्याच्या पोस्टमध्ये जे लोक आपली मनमानी करून कलाकारांशी असं वागतात, त्यांचा पर्दाफाश करणं गरजेच आहे आणि यात सर्वात मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे सलमान खान असं म्हणत सलमानवर थेट आरोप केले आहेत.
सुशांतच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ देण्याचं सलमानचं आवाहन
सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेता सलमान खान याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ट्विटरवरून याबाबत प्रतिक्रिया दिली होती. सलमान खानने या कठीण प्रसंगात सुशांतच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या चाहत्यांची साथ देण्याचे आवाहन केले आहे.
A request to all my fans to stand with sushant's fans n not to go by the language n the curses used but to go with the emotion behind it. Pls support n stand by his family n fans as the loss of a loved one is extremely painful.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 20, 2020
सलमान त्याच्या ट्वीटमध्ये असं म्हणाला आहे की, 'माझ्या चाहत्यांनी माझी अशी विनंती आहे की सुशांतच्या चाहत्यांबरोबर उभे राहा आणि त्यांनी वापरलेल्या भाषेकडे लक्ष न देता त्यामागील भावना समजून घ्या. कृपया त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना साथ द्या कारण आपल्या माणसांचे जाणे अत्यंत वेदनादायक आहे.'
संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.