मुंबई, 11 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिने कहाणी, जलसा तसेच डर्टी पिक्चर या चित्रपटाद्वारे ती कोणत्याही भूमिकेत सहज मिसळून जाण्याची ताकद तिने दाखवून दिली आहे. सध्या तीची विनोदी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. तिने फारशा विनोदी भूमिका साकारल्या नसल्या तरी सध्या ती करत असलेल्या रिल्सवरून विनोदी भूमिकेतील विद्या बालन प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नजर टाकली तर अनेक मजेशीर रील्स पाहायला मिळतात. पण सध्या तिने मराठीत केलेल्या रिलची जास्त चर्चा होतेय. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’चे अनेक चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींनीही त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचे जुने व्हिडीओ सुद्धा अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने या कार्यक्रमातील कुशल बद्रिकेच्या एका व्हिडिओवर तिने रील बनवलं आहे. तिचं हे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हेही वाचा - Har Har Mahadev : प्रतीक्षा संपली! अंगावर शहरे आणणारा हर हर महादेवचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित ‘चला हवा येऊ द्या’मधील भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके यांच्यातील एक संवाद घेऊन विद्या बालनने भन्नाट रील व्हिडीओ बनवला आहे. विद्या बालनने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या संवादात भारत गणेशपुरे कुशलला विचारतात, “एका व्यक्तीला खोकला येत असेल तर तुम्ही त्याला कोणतं औषध द्याल?” त्यावर कुशल म्हणतो, “मी त्याला आधी जुलाबाचं औषध देईन आणि मग सांगेन आता दाखव खोकून.” कुशल आणि भारत गणेशपुरे यांच्यातील या विनोदी संभाषणावर विद्या बालनने परफेक्ट लिपसिंक केलं आहे.
विद्या फार चांगलं मराठी बोलते हे फार लोकांना माहीत नाही.विद्या लहानपणापासून मुंबईत वाढली आहे. त्यामुळे ती उत्तम मराठी बोलते. अशात आता तिच्या मराठी चाहत्यांना अभिनेत्रीचा हा रील आवडला असणार यात काही शंका नाही.
विद्याच्या या व्हिडिओवर मराठमोळ्या मृणाल ठाकूरने, ‘हाहाहा… किती क्यूट’ अशी कमेंट केली. तसेच इतर अनेक सेलिब्रेटींनी आणि चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या. तसंच तिचं हे रील झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरूनही शेअर करण्यात आलं आहे. आता यापुढे वैद्याकडून असेच अजून मराठी रील पाहता यावेत अशी आशा तिचे मराठी चाहते नक्कीच करत असतील.