नवी दिल्ली, 6 मार्च: विद्या बालन तिच्या अभिनयासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि तिचे सर्व चाहते लवकरच तिला एखादा दमदार आणि चांगल्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आतापर्यंत विद्याने वैज्ञानिक, तर कधी गणिताच्या शिक्षकाची भूमिका, तर डर्टी पिक्चर मध्ये ‘सिल्क’ची भूमिका अशा अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांना आपल्या अभियानयाने प्रभावित केलं आहे. नुकतीच ती गणितज्ज्ञ शंकुताला देवीच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेत तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता ती लवकरच तिच्या पुढच्या ‘शेरनी’ (Sherni) चित्रपटात एका रोचक पात्रात दिसणार आहे. लॉकडाउननंतर विद्या बालनचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात विद्या वन अधिकारी म्हणून दिसणार आहे. अलीकडेच तिने पुन्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं आहे. कोरोना महामारीमुळे या चित्रपटाचं शूटिंग मध्यभागी थांबवावं लागलं होत. सध्या मध्यप्रदेश मध्ये या चित्रपटाचं शुटींग सुरु आहे. एका मुलाखतीत विद्या बालन म्हणाली होती, ‘शकुंतला देवी जुलैमध्ये रिलीज झाली होती, परंतू कोरोनामुळे ‘शेरनी’ कधी प्रदर्शित होईल याची मला अजून काहीच कल्पना नाही. हा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल हे देखील मला माहिती नाही. पण काही महिन्यांनंतर हा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होईल.’ विद्याला नवीन आणि आव्हानात्मक भूमिकेत पाहण्याची प्रेक्षक उत्सुक आहेत. विद्या बालन ‘परिणीता’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ किंवा ‘तुम्हारी सुलु’ आणि बायोपिक ‘शकुंतला देवी’ सारख्या चित्रपटांमधील चमकदार कामगिरीसाठी ओळखली जाते. या चित्रपटांमधील तिच्या कामाचे लोकांकडून खूप कौतुक झाले होते. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना विद्याने ‘शेरनी’ चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. पोस्टमध्ये, ती देवाकडे आशीर्वाद मागताना दिसली होती.
हे वाचा - ‘आम्ही पुन्हा येतोय…’; Income Tax रेडनंतर अनुरागनं ट्रोलर्सला डिवचलं या पोस्टमध्ये विद्याने लिहिलं आहे की, ‘#WorldWildlifeDay च्या मुहूर्तावर ‘शेरनी’ चित्रपटाचं शुटींग सुरु केलं जाणारं आहे. चांगली गोष्ट अशी आहे की यासाठी जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका प्राचीन मंदिरात पूजा केली जाणारं आहे.’ या पोस्टमध्ये विद्याने टीममधील सदस्यांनाही टॅग केलं आहे.