मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘आम्ही पुन्हा येतोय...’; Income Tax रेडनंतर अनुरागनं ट्रोलर्सला डिवचलं

‘आम्ही पुन्हा येतोय...’; Income Tax रेडनंतर अनुरागनं ट्रोलर्सला डिवचलं

आयकर विभागाच्या पथकानं अनुरागच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले. (IT raid Anurag Kashyap) मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. या कारवाईमुळं अनुरागवर प्रचंड टीका केली गेली.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 6 मार्च: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) घरावर आयकर विभागानं धाड टाकली. आयकर विभागाच्या पथकानं अनुरागच्या मुंबईतील मालमत्तेवर छापे टाकले. (IT raid Anurag Kashyap) मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. या कारवाईमुळं अनुरागवर प्रचंड टीका केली गेली. काही जाणांनी तर त्याची तुलना देशद्रोह्यांशी देखील केली. मात्र या टीकाकारांना आता अनुरागनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अनुरागनं इन्स्टाग्रामवर तापसी पन्नूसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर त्यानं “आम्ही पुन्हा एकदा सुरुवात करतोय. टीकाकारांना आमच्याकडून भरपूर प्रेम” अशा आशयाची कॉमेंट लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. आयकर विभागानं कारवाई केल्यापासून अनुरागची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. परिणामी त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा - 'Not So Sasti Anymore', आयकर विभागाच्या रेडनंतर तापसीची पहिली प्रतिक्रिया

यापूर्वी तापसी पन्नूनं देखील टीकाकारांना अशाच प्रकारचं ट्विट करुन उत्तर दिलं होतं. तिनं “पॅरिसमध्ये मी कुठल्याही प्रकारचा बंगला खरेदी केलेला नाही. त्यामुळं पाच कोटी रुपयांची रिसिप्ट कुठून आली मला माहित नाही. शिवाय 2013 साली माझ्या घरावर कुठल्याही प्रकारची धाड टाकली गेली नव्हती.” अशा आशयाचं ट्विट केलं होतं.

'फँटम फिल्म'आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

First published:

Tags: Anurag kashyap, Entertainment, Financial crime, Marathi entertainment, Taapsee Pannu