मुंबई, 24 मार्च: अभिनेता शाहरुख खानच्या ‘एसआरके प्लस’ (Shah Rukh Khan is launching SRK+?) या नव्या ओटीटी अॅपसाठी नवनव्या कल्पनांचा शोध सुरू असल्याचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. पण डिस्ने हॉटस्टारबरोबर (Disney+ Hostar) त्याची तगडी स्पर्धा आहे. या आधीच्या व्हिडीओमध्ये सुपरस्टार शाहरुख अनुराग कश्यपसोबत (Anurag Kashyap) नवनव्या कल्पना शोधण्याची धडपड करताना शाहरूख खान दिसला होता. अलीकडच्या लेटेस्ट व्हिडीओमध्ये शाहरुख, अनुराग कश्यप आणि अभिनेता गोपाल दत्त तिघेजण एसआरके प्लस या अॅपविषयी बोलताना दिसतात. त्यावेळी दत्त शाहरुखला विचारतो, सगळे सुपरस्टार्स डिस्ने हॉटस्टार प्लसकडे (DisneyPlusHS) गेलेले आहेत. मग आपलं काय? नव्या एसआरके प्लस अॅपचं आपण नेमकं काय करणार आहोत? तेव्हा शाहरुख त्याला म्हणतो, अरे माझ्या अॅपचं तर नावचं पुरेसं आहे. ‘पण हॉटस्टारचं तर कामच पुरेसं बोलकं आहे.’ असं म्हणून दत्त पुढे डिस्ने हॉटस्टारच्या सगळ्या गाजलेल्या कार्यक्रमांची नावं सांगतो. यंदासुद्धा यांच्याच वेबसीरिज, सिनेमे गाजलेल्या आहेत आणि टॉपला आहेत, असं म्हणत अनुराग गोपालची री ओढतो आणि हे शो कसे ट्रेंड करतायत ते दाखवण्यासाठी शाहरुखला मोबाईल देतो. आणि मग काय वैतागलेला शाहरुख तो फोन सूपच्या वाटीत पाडतो. त्यानंतर तो फोन वाजतो तेव्हा शाहरूख म्हणतो हॉटस्टारसारखंच हा फोनही वाजणं थांबवणार नाही. हे वाचा- The Kashmir Files सह वादानंतर आता बंद होणार The Kapil Sharma Show? वाचा काय आहे कारण यानंतर डिस्ने हॉटस्टारची जाहिरात या व्हिडीओमध्ये दिसते की या अॅपवर सगळं काही आहे, तेव्हा शाहरुख तू थोडं थांब. थोडा रुक शाह रुख या हॅशटॅगवर ही जाहिरात संपते. शाहरुख या व्हिडीओला ‘दिल तो पागल था अब दिमाग भी खराब कर दिया @DisneyPlusH वालोंने’ अशाप्रकारे गमतीशीर कॅप्शन देतो.
Dil toh pagal tha, ab dimaag bhi kharaab kar diya @DisneyPlusHS walon ne 🤬 pic.twitter.com/N2d59xoqcL
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 24, 2022
या महिन्याच्या सुरूवातीलाच शाहरुखने शाहरुख प्लस या अॅपचं पोस्टर लाँच करून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता ताणली होती. सलमान खान, अजय देवगण आणि अनुराग कश्यपसारख्या सिनेसहकाऱ्यांनी ओटीटी अॅप लाँच करण्यासाठी शाहरुखचे अभिनंदनही केले होते. पण खरंतर कोणतंही App शाहरुख लाँच करत नसून हा फक्त डिस्ने हॉटस्टारच्या जाहिरातीचा एक भाग आहे. शाहरुखचे हे ताजे व्हिडिओही तेच सांगतात. शाहरुखने अनुराग कश्यपचा फोन सुपमध्ये कसा काय टाकला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नवं व्हिडिओ जाहिरात कँपेन आहे. त्यातली ही ताजी जाहिरात आहे. वाचा- Desi Girl चा सुंदर Saree Look, प्री-ऑस्कर इव्हेंटमध्ये प्रियंकाचा भारतीय अंदाज; पाहा VIDEO दरम्यान शाहरुख सध्या बहुप्रतिक्षित पठाण या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत. सिनेमा 25जानेवारी 2023ला प्रदर्शित होणार आहे.