मुंबई, 16 सप्टेंबर : हिंदी बिग बॉस (contestants list Bigg Boss Marathi 3) या मालिकांच्या प्रत्येक सीजनने प्रसिद्धीचा टप्पा पार केला आहे. मराठीतही आतापर्यंत बिग बॉसचे दोन सीजन येऊन गेले असून तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Bigg Boss marathi Season 3 live) येणार आहे. यंदाच्या सीजनमध्ये कोणकोणते मराठी कलाकार सहभागी होणार याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये आतुरता आहे.
कलर्स मराठी चॅनलवर लवकरच मराठी बिग बॉग पाहायला मिळणार आहे. 19 सप्टेंबरला होणाऱ्या प्रीमीयरमध्ये नेमकी सदस्यांनी नावे समोर येणार आहेत. मात्र तमाम मराठी प्रेक्षक आवर्जुन तिसऱ्या सीजनच्या प्रतिक्षेत आहे.
दरम्यान कलर्सने दोन प्रोमो शेअर केले असून यातून प्रेक्षकांची प्रतीक्षा अधिकच ताणली गेली आहे. या व्हिडीओमध्ये सदस्य दिसत असले तरी अद्याप त्यांचा चेहरा मात्र गुपितच ठेवला आहे. त्यामुळे हा कोणता कलाकार असू शकेल यावर प्रेक्षक अंदाज बांधत आहेत. तुम्हाला तरी कलाकार ओळखू येत आहेत का ?
पाहा प्रोमो...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.