जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : वडिलांच्या आठवणीत हिना खान भावुक; कोविडमधून बरी झाल्यानंतर साधला चाहत्यांशी संवाद

VIDEO : वडिलांच्या आठवणीत हिना खान भावुक; कोविडमधून बरी झाल्यानंतर साधला चाहत्यांशी संवाद

VIDEO : वडिलांच्या आठवणीत हिना खान भावुक; कोविडमधून बरी झाल्यानंतर साधला चाहत्यांशी संवाद

काश्मीरमध्ये (Kashmir) एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असतानाच तिच्या वडिलांचे, अस्लम खान(Aslam Khan)यांचे हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं ती तातडीनं मुंबईत आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 13 मे : सोशल मीडियावर भरपूर फॅन फॉलोइंग असणारी अभिनेत्री हिना खान(Hina Khan)गेले अनेक दिवस सोशल मीडियापासून दूरच होती. काश्मीरमध्ये (Kashmir) एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असतानाच तिच्या वडिलांचे, अस्लम खान(Aslam Khan)यांचे हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं ती तातडीनं मुंबईत आली; पण त्या दरम्यान, तिला कोविड-19 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं गेले काही दिवस ती अजिबातच सोशल मीडियावर दिसली नाही. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत होते. दी इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार**,**कोविडमधून बरी झाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानण्यासाठी हिना खाननं इन्स्टाग्रामवर लाईव्ह सेशन केलं. ‘या संकटाच्या काळात चाहत्यांनी जे प्रेम, पाठबळ दिलं त्यामुळं खूप आधार मिळाला. मी खूप दिवस इथं नव्हते, तर चाहत्यांनी मेसेज पाठवून माझी चौकशी केली. चाहत्यांचे हे प्रेम बघून मी भारावून गेले आहे, असं सांगत तिनं चाहत्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

    जाहिरात

    आता आपण बरे असून, कोविड टेस्ट (Covid Test) निगेटीव्ह आली आहे. मात्र अद्याप कफ आणि छाती भरल्यासारखं वाटणे असे त्रास होत असून, अतिशय थकवा आल्याचं तिनं चाहत्यांशी संवाद साधताना म्हटलं आहे. वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानं सैरभैर मनस्थितीत काश्मिरमधून परत येताना योग्य काळजी घेतली गेली नसावी, त्यामुळं मला तेव्हा कोविड-19 ची लागण झाली असावी. सुदैवानं माझे कुटुंबीय यापासून सुरक्षित राहिले, हे खूप महत्त्वाचं आहे, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.‘खूप अशक्तपणा जाणवत असल्यानं आणि अचानक कोसळलेल्या दुःखामुळे आपण या वेळी रमजान महिन्यात उपवास करू शकलो नाही, असंही तिनं म्हटलं आहे. हे ही वाचा- ‘तुला यातलं खरंच काही कळतं का?’ हिटलरचं समर्थन केल्यामुळं वीणा मलिक ट्रोल आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या वडिलांच्या आठवणीनं हिना खूप भावूक झाली होती. एका चाहत्यानं तू खूप दुःखी आहेस का, असा प्रश्न विचारल्यावर‘मी माझ्या वडिलांची धीट, हिम्मतवान मुलगी आहे, असं उत्तर तिनं दिलं. मी माझ्या वडिलांचा टी-शर्ट घातला आहे. मी त्यांचे कपडे घालते, असंही तिनं सांगितलं. मात्र या विषयावर आता जास्त बोलायला नको असं सांगत तिनं चाहत्यांना आपल्या नवीन येणाऱ्या ‘पत्थर वारगी’(Patthar Wargi)गाण्याबद्दल(Song)बोलण्याची विनंती केली. त्याचबरोबर तिनं चाहत्यांना जवळच्या व्यक्तींची काळजी घेण्याचं आवाहन केलं तसंच दोन मास्क वापरणं फायद्याचं असल्याचंही सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात