जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तुला यातलं खरंच काही कळतं का?’ हिटलरचं समर्थन केल्यामुळं वीणा मलिक ट्रोल

‘तुला यातलं खरंच काही कळतं का?’ हिटलरचं समर्थन केल्यामुळं वीणा मलिक ट्रोल

‘तुला यातलं खरंच काही कळतं का?’ हिटलरचं समर्थन केल्यामुळं वीणा मलिक ट्रोल

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धात वीणामलिकनं घेतली उडी; भारतीयांनी ट्रोल करताच अभिनेत्रीनं घेतली माघार

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 13 मे**:** इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. (Israeli–Palestinian conflict) इस्लामी गट आणि पॅलेस्टाईनमधील अतिरेक्यांमध्ये सुरु असलेल्या या संघर्षामुळं सामान्य जनता होरपळून निघाली आहे. नुकतंच इस्रायलनं केलेल्या रॉकेट हल्ल्यात पॅलेस्टाइनमधील 35 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेचा प्रभाव सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. जगभरातील सेलिब्रिटी मंडळी दोन्ही पैकी एका देशाच्या बाजूनं आपलं मत ठोकत आहेत. या शाब्दिक युद्धात आता पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक (Veena Malik) हिनं देखील उडी घेतली. तिनं तर थेट जर्मनीचा हुकुमशाह अडॉल्फ हिटलरचीच (Adolf Hitler) बाजू घेतली. परंतु यामुळं भारतीय नेटकऱ्यांनी मात्र तिला जोरदार ट्रोल केलं आहे. विणानं हिटलरनं केलेल्या ज्यूंच्या नरसंहाराचं समर्थन केलं होतं. “मी सर्व ज्यूंना ठार मारु शकलो असतो, पण काहींना जिवंत ठेवलं. कारण जगाला समजावं की मी काही ज्यूंना का मारलं” हे हिटलरचं वाक्य ट्विट करत तिनं इस्रायल विरोधात मतप्रदर्न केलं. अर्थात तिनं पॅलेस्टाइनची बाजू घेतली यापेक्षा तिनं हिटलरचं समर्थन केलं यामुळं नेटकरी तिच्यावर संतापले. ‘खरंच तुला यातलं काही कळतं का?’ असा सवाल करत भारतीयांनी तिच्यावर जोरदार टीका केली. अखेर वाढत्या टीकेमुळं तिनं ते ट्विट डिलिट केलं. मात्र तिच्याविरोधात होणारी टीका अद्याप थांबलेली नाही. युद्ध होण्यामागे नेमका वाद काय आहे**?** जेरुसलेममध्ये इस्त्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये वाद झाल्यानंतर हमास आणि इस्त्रायलमध्ये हे युद्ध पेटले आहे. ही जागा मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र आहेत. मुस्लिम याला हराम अल् – शरीफ ( पवित्र ठिकाण) म्हणतात तर ज्यू याला टेंपल माऊंट म्हणून ओळखतात. इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता पण बहुतांश देशांनां हे अमान्य होतं. पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेमवर हक्क सांगितल्याने हा वाद चिघळला आहे. गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे. ईस्ट जेरुसलेमवर हक्क सांगणाऱ्या ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हिसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे. इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार होती, पण हिंसाचाच्या घटनांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात