जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vicky Welingkar Poster : काय या मुखवट्यामागे दडलेल्या चेहऱ्याचं रहस्य!

Vicky Welingkar Poster : काय या मुखवट्यामागे दडलेल्या चेहऱ्याचं रहस्य!

Vicky Welingkar Poster : काय या मुखवट्यामागे दडलेल्या चेहऱ्याचं रहस्य!

‘मराठी सिनेमांमध्ये अशा प्रकारचे ‘मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. पण ‘विक्की वेलिंगकर’मध्ये पहिल्यांदा ‘मास्क मॅन’चा प्रयोग करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑक्टोबर : मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या सिनेमात साकारली जात आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी सिनेमामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या सिनेमाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स खूप  वाढला आहे. या थ्रिलर मराठी सिनेमातील या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती 6 डिसेंबरला  ‘विक्की वेलिंगकर’ प्रदर्शित होईपर्यंत ताणली जाणार आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे. ‘विक्की वेलिंगकर’चं नवं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवटयामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली जात नाही. या मुखवट्यामागे नेमका कोणाचा चेहरा आहे याबद्दल अनेक कयास लावले जात असले तर त्याबद्दल कोणीही ठामपणे सांगू शकलेले नाही. मात्र ही मराठीतील अनोखी संकल्पना असल्याचे प्रत्येकानेच मान्य केले आहे. Bigg Boss 13 : दरवाजा लॉक न करता आंघोळ करत होता सिद्धार्थ आणि…

जाहिरात

‘मराठी सिनेमांमध्ये अशा प्रकारचे ‘मॅन’ कॅरेक्टर कधीच साकारले गेले नव्हते. ‘मास्क मॅन’ ही व्यक्तिरेखा या ‘विक्की वेलिंगकर’च्या या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. मात्र चांगल्याचा वाईटावर विजय होतो का हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा रिलीज होण्याची वाट पहावी लागेल.’ असं या सिनेमाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी म्हटलं. वर्मा यांनी यापूर्वी  ‘मिकी व्हायरस’, ‘7 अवर्स टू गो’ आणि इतर अनेक गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ग्लोबलस्टार प्रियांकाला आजही आहे ही ‘मिडल क्लास’ सवय, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

ही कथा एका तरुणीवर बेतलेली असून ही तरुणी कॉमिक पुस्तक कलाकार आहे आणि ती घड्याळे विकते. आजच्या डिजिटल अनागोंदीच्या काळात ती विक्री करीत असलेल्या वस्तूंना तसे काहीच महत्त्व नाही.या सिनेमाच्या कथेमध्ये अनेक धक्के आणि वळणे आहेत. ‘मास्क मॅन’ हा केवळ एक ट्रेलर आहे. ज्याप्रमाणे रामाचा रावणावरील विजय हा अनेकांना प्रेरणादायी आणि नवी उमेद देणारा ठरतो त्याप्रमाणे ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा शेवट आनंदायी होतो का? हे पाहणं औत्सुक्याचं असेल. SHOCKING! ‘मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका’ कार्तिक आर्यनची पॅपराजीला विनंती ============================================================== ‘370चं भांडवल करणारे 371 वर गप्प का?’ शरद पवारांचा अमित शाहांना सवाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात