**मुंबई, 9 डिसेंबर -**विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) आज, 9 डिसेंबरला राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे आयुष्यभरासाठी लग्नबंधनात अडकणार आहेत. कॅट आणि विकीने त्यांचे लग्न पूर्णपणे गोपनीय ठेवले आहे. लग्नाचा एकही फोटो व्हायरल होऊ नये यासाठी विशेष (Katrina Kaif and Vicky Kaushal wedding LIVE Updates) व्यवस्था करण्यात आली आहे.मोबाईल फोटोग्राफीसह कार्यक्रम स्थळावर ड्रोन फिरवण्याबाबत कडक सुचना देण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर लग्नाला येणार् पाहुण्यांसाठी काही खास नियम बनवण्यात आले आहेत आणि हे नियम पाळायचे आहेत. यामुळेच लग्नाच्या विधींचे एकही फोटो किंवा व्हिडिओ (Katrina Kaif-Vicky Kaushal wedding venue PICS ) आतापर्यंत समोर आलेला नाही. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत, जे पाहून हसण्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. जेव्हा विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या कोणत्याही विधींचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले नाहीत, तेव्हा सोशल मीडियावरमात्र मीम्सचं पीक जोरात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तर तुम्ही पोट धरून हसणार नाही तर खाली पडून लोळून लोळून हसाल. वाचा : VIDEO: Vickat Wedding आधी एअरपोर्टवर दिसला सलमान खान, पोहोचणार का Ex-गर्लफ्रेंडच्या लग्नात? हा व्हिडिओ ट्विटरवर एका अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, व्हिडिओची सुरुवात विकी कौशल आणि कतरिना कैफपासून होते. प्रियांका चोप्रा, निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कंगना रणौत, रेखा, धोनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आला आहे. वाचा : Katrina-Vicky wedding: एवढ्या सुरक्षेचा काय फायदा, शेवटी व्हायचं तेच झालं मेंदीचे फोटो व्हायरल? हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. कॅट आणि विकीचे लग्न आज सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये होणार आहे. या लग्नाला 120 पाहुणे येणार आहेत.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाचं आजच्या दिवसाचे शेड्यूल- सकाळी 8:00 ते 11:00 पर्यंत नाश्ता सेहरा बंदि दुपारी 1:30 नंतर असेल. हॉटेल लॉनमध्ये दुपारी 3:०० वाजता मंडप सजवला जाईल. त्यानंतरच हॉटेलच्या आतून पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन विकी कौशल वरातीसाठी निघणार. कतरिना कैफ आणि विकी कौशल संध्याकाळी 6 वाजता 7 फेरे घेतील. रात्री 8 वाजल्यानंतर रात्री उशिरापर्यंत विवाह सोहळा चालणार आहे. हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचे लग्न होणार आहे.