मुंबई, 19 डिसेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) त्यांच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे एकापाठोपाठ एक सुंदर फोटो शेअर करून त्यांनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. लग्नानंतर सोशल मीडियावरही लोक त्यांच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. लग्नाआधी दोघेही बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohali) यांचे शेजारी बनणार असल्याच्या बातम्या येत होत्या.
कतरिना आणि विकीच्या लग्नानंतर अनुष्काने या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता लग्नाच्या 10 दिवसांनंतर आज विकी आणि कतरिनाच्या नव्या घराचा मुहूर्त ठरला आहे. आज कॅट आणि विकी त्यांच्या कुटुंबियांसह गृह प्रवेश आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या कुटुंबियांसोबत ही पूजा करणार आहेत. रविवारी कतरिना आणि विकी संपूर्ण कुटुंबासह नवीन घरात गृहप्रवेशाच्या पूजेसाठी पोहोचले आहेत. विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शनिवारी रात्री नवीन घराचा आढावा घेतल्यानंतर कॅट आणि विकी दोघेही त्यांच्या नवीन घराची पूजा करण्यासाठी आज सकाळी येथे पोहोचले आहेत.यावेळी विकी कौशलची आई आणि वडील श्याम कौशल देखील दिसले. दोघांच्या शांत आणि साध्या स्वभावानं पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकली आहेत. नवीन घराची पूजा करण्यासाठी एक पुजारी इमारतीच्या मुख्य गेटमधून जातानाही दिसले. व्हिडिओ पाहून चाहत्यांना आशा आहे की, कदाचित हे पुजारी विकी आणि कतरिनाच्या नवीन घरातील पूजा संपन्न करतील.
मुंबईतील पॉश एरिया असलेल्या जुहू येथील एका इमारतीत अनुष्का आणि विराटने दोन मजले खरेदी केले आहेत. या इमारतीत विकी कौशलने आठव्या मजल्यावर पाच वर्षांसाठी भाड्याने अपार्टमेंट घेतलं आहे. रिपोर्ट्सनुसार, विकी आणि कतरिनाचे हे नवीन घर 5 हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे. ज्याची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. ही एक सी फेसिंग इमारत आहे. ज्यामध्ये अनेक लग्जरी सुविधादेखील आहेत.