मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याआधी 2018मध्ये पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर 11 महिने 11 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या तब्येतीत विशेष सुधारणा झाली नाही, आणि सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराकडून आलेल्या निवेदनात, शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरांरापासून सर्व मेडिकल कर्मचाऱ्यांचे ते मनोरंजन करत होते.
कपूर कुटुंबाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या संदेशात. 'आमच्या लाडक्या ऋषी कपूरचे दोन वर्ष ल्यूकेमिया या आजाराशी झुंज दिल्यानंतर आज सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी निधन झाले. रुग्णालयाच्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले की ऋषी कपूर शेवटच्या क्षणापर्यंत मनोरंजन करत होते. दोन वर्षे या महाभयंकर आजाराशी सामना करत, दृढ इच्छेसह जगले'. या संदेशात असेही म्हटले आहे, 'कर्करोगामध्येही ऋषी कपूरचे लक्ष नेहमी कुटुंब, मित्र, भोजन आणि चित्रपटांवर होते. त्यांच्या आजारपणात त्यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आश्चर्य वाटले की, त्यांनी आजारपणातही कुटुंब, मित्र, भोजन आणि चित्रपट कसे सोडले नाही'.
वाचा-जीवन मरणाशी लढत होते ऋषी कपूर, मुलानं सांगितलं वडिलांच्या मनात काय होतं
कुटुंबाने पुढे असेही लिहिले की, 'जगभरातून आलेल्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल तो कृतज्ञ होता. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर चाहत्यांनी त्यांना हसत हसत लक्षत ठेवलेले त्यांना आवडेल, डोळ्यात पाणी नाही'
कोरोना संकटाचा संदर्भ देताना त्या कुटुंबाने लिहिले की, 'वैयक्तिक नुकसानीच्या या प्रसंगात हे देखील समजत आहे की जग एक अतिशय कठीण आणि अडचणीच्या काळातून जात आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर अनेक निर्बंध आहेत. आम्हाला त्याच्या सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना आणि कौटुंबिक मित्रांनी कायद्याचा आदर आणि पालन करा. दुसरा कोणताही मार्ग नाही'.
वाचा-अवघ्या 22 तासांत एकाच आजारामुळं बॉलिवूडनं गमावले दोन चमकते तारे
अमेरिकेत घेतले होते उपचार
दरम्यान, अमेरिकेतून परतल्यानंतरही ऋषी कपूर पूर्णपणे बरे झाले नव्हते. त्यांच्यावर मुंबईतही सुरू होते. श्वासोच्छावासाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना बुधवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. आज सकाळी 8:45 वाजता ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.ऋषी कपूर यांनी दोन वर्ष ल्यूकेमिया या आजाराविरुद्ध लढा दिला होता.
वाचा-शेवटच्या श्वासापर्यंत तिनं दिली साथ..., ऋषी कपूर यांची न ऐकलेली गोष्ट
असा होता ऋषी कपूर यांचा सिनेमाचा प्रवास
1970 सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 40 वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका निभावल्या. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. 90 च्या व 2000 च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला, कुछ तो है या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नविन) मध्ये रौफ लालाची भूमिका चांगलीच गाजली होती.
संकलन, संपादन-प्रियांका गावडे.