पहिल्या धक्क्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत तिनं दिली साथ..., ऋषी कपूर यांच्या आयुष्यातली न ऐकलेली गोष्ट

पहिल्या धक्क्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत तिनं दिली साथ..., ऋषी कपूर यांच्या आयुष्यातली न ऐकलेली गोष्ट

2018मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नीतू सिंग त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी कधीच साथ सोडली नाही.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याआधी 2018मध्ये पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. या त्यांच्या खडतर प्रवासात त्यांच्या सोबत एक व्यक्ती कायम होती, ती म्हणजे त्यांची पत्नी नीतू सिंग.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्हस्टोरी एखाद्या बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नाही आहे. वयाच्या 21व्या वर्षी नीतू सिंग यांनी ऋषी कपूर यांच्याशी विवाह केला, तो फक्त पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमामुळं. एकमेकांसोबत दोघांनी अनेक खडतर प्रवास पार केला. ऋषी कपूर आणि नितू सिंग यांचा पहिला सिनेमा होता जहरीला इंसान. या सिनेमामध्ये काम करताना त्यांची मैत्री झाली. नीतू त्यावेळी फक्त 14 वर्षांच्या होत्या. ऋषी कपूर यांनी नीतू यांना पाहताच ते त्यांच्या प्रेमात पडले. पहिल्या नजरेतील प्रेम कदाचित यालाच म्हणतात. त्यावेळी नुकतेच ऋषी कपूर यांचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर त्यानी जहरीला इंसानच्या सेटवरच नीतू सिंग यांना प्रपोज केलं आणि ते दुसऱ्या सिनेमासाठी युरोपला गेले. मात्र त्याचं मन काही लागत नव्हतं. त्यांनी त्यावेळी नीतू सिंग यांना टेलीग्राम पाठवला होता की,'माझं तुझ्याशिवाय मन नाही लागत आहे'.

ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचं प्रेम खुललं ते बॉबी सिनेमाच्या सेटवर. नीतू आणि ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमे एकत्र केले. 'रफू चक्कर', 'दूसरा आदमी', 'कभी-कभी', 'अमर अकबर एंथोनी' सारख्या सिनेमांमध्ये लोकांनी त्यांना खूप पसंत केले. एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांनी सांगितलं की, 'मला फक्त हिच सांभाळू शकते'. 22 जानेवारी 1980मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा विवाह झाला. यावेळी नीतू सिंग फक्त 21 वर्षांच्या होत्या तर ऋषी कपूर 26 वर्षांचे. अगदी लहानवयात सुरू झालेली ही लव्हस्टोरी कायम स्मरणात राहिल.

RIP Rishi Kapoor : 3 महिन्यांपूर्वी शेअर केला होता लतादीदींबरोबरचा हा UNSEEN फोटो

2018मध्ये ऋषी कपूर यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नीतू सिंग त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी कधीच साथ सोडली नाही. मुंबईत आल्यानंतरही सावलीप्रमाणे ऋषी कपूर यांची काळजी घेतली. आजही त्यांच्या शेवटच्या क्षणी नीतू सिंग त्यांच्या सोबत होत्या.

असा होता ऋषी कपूर यांचा सिनेमाचा प्रवास

1970 सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका निभावल्या. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. 90 च्या व 2000 च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला, कुछ तो है या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नविन) मध्ये रौफ लालाची भूमिका चांगलीच गाजली होती.

बॉलिवूडपासून दूर, तरीही कोट्यवधींची मालकीण आहे कपूर घराण्याची 'ही' लेक

 

 

First published: April 30, 2020, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या